बॅंक कर्मचाऱ्यांच्या मनमानीला कंटाळलाय, करा हे एकच काम... तात्काळ होईल अॅक्शन!
आपल्यापैकी बरेच जणांना बॅंकेत गेल्यानंतर, बॅंक कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा अनुभव आला असेल. यात प्रामुख्याने जेवणाची सुट्टी आणि तासनतास ताटकळत उभ्या राहण्याच्या समस्येमुळे बॅंक खातेदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे अनेकदा बॅंक अधिकारी, कर्मचारी यांच्यावर खातेदारांचा चांगलाच संताप अनावर होतो. अशातच आता तुम्हांला बॅंक कर्मचाऱ्यांवर अशावेळी घेता येण्याजोग्या अॅक्शनबाबत माहिती असेल तर तुम्ही आपल्या होणाऱ्या गैरसोयीबाबत तक्रार करू शकतात. याच पार्श्वभुमीवर आज आपण सविस्तर जाणून घेऊया…
करू शकतात बँकिंग लोकपालकडे तक्रार
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) बँक ग्राहकांना अनेक प्रकारचे अधिकार दिले आहेत. ज्यात प्रामुख्याने अनेक सुविधा देखील दिल्या आहेत. ज्याद्वारे तुम्ही अशा समस्यांबद्दल तक्रार करू शकतात. यात प्रामुख्याने तुम्ही त्या बॅंक कर्मचाऱ्याची थेट बँकिंग लोकपालकडे तक्रार करू शकतात. यात ज्या बँक कर्मचाऱ्याने तुमचे काम करण्यास उशीर असेल अशा बँकेच्या बँक मॅनेजर किंवा नोडल ऑफिसरकडे जाऊन, तुम्हांला याबाबत तक्रार करायची आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
बँक ग्राहक तक्रार निवारण मंच
साधारणपणे अशा परिस्थितीत बँक ग्राहक तक्रार निवारण क्रमांकावरही तक्रार नोंदवली जाऊ शकते. खरे तर, ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी जवळपास प्रत्येक बँकेत तक्रार निवारण मंच असतो. ज्याद्वारे आलेल्या तक्रारींवर तात्काळ कारवाई केली जाते. यासाठी तुम्ही ज्या बँकेचे ग्राहक असाल त्या बँकेचा तक्रार निवारण क्रमांक घेऊन तक्रार करू शकतात. याशिवाय बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा बँकेच्या ऑनलाइन पोर्टलवर देखील तक्रार नोंदविण्याची सुविधाही देण्यात आली आहे.
कशी कराल तक्रार
जर तुम्हाला अशा प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागला असेल आणि वर नमूद केलेल्या सर्व पद्धतींनीही ही समस्या सोडवली गेली नसेल. तर तुम्ही तुमच्या समस्येची थेट बँकिंग लोकपालाकडे तक्रार करू शकतात. यासाठी तुम्ही तुमची तक्रार ऑनलाइन पाठवू शकतात. तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला https://cms.rbi.org.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर जेव्हा होमपेज उघडेल, तेव्हा तुम्हाला तिथे दिलेल्या File A Complaint या पर्यायावर क्लिक करावे लागेल. याशिवाय, CRPC@rbi.org.in वर ईमेल पाठवून बँकिंग लोकपालकडेही तक्रार करता येईल. बँक ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी, आरबीआयचा टोल फ्री क्रमांक १४४४८ आहे, ज्यावर कॉल करून समस्येचे निराकरण केले जाऊ शकते.