इंडिगो, एअर इंडियाला टक्कर देणार 'ही' नवीन विमान वाहतुक कंपनी, मिळालीये सरकारकडून मंजुरी
देशाच्या विमान वाहतूक क्षेत्रात एक नवीन विमान कंपनी उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने देशातील सर्वात नवीन विमान कंपनी शंखा एअरलाइन्सला आपले कार्य सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. दरम्यान, अधिकृतपणे उड्डाणे सुरू करण्यापूर्वी शंखा एअरलाइनला विमान वाहतूक नियामक नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून मंजुरी मिळवणे आवश्यक असणार आहे.
एनओसी तीन वर्षांसाठी वैध असणार
विशेष म्हणजे ही उत्तर प्रदेशची पहिली अनुसूचित विमान कंपनी असणार आहे. जिचे मुख्यालय लखनऊ आणि नोएडा येथे असणार आहे. कंपनीच्या संकेतस्थळानुसार, एअरलाइनचे उद्दिष्ट देशातील प्रमुख शहरांना जोडण्याचे आहे. ज्या मार्गांची मागणी जास्त आणि पर्याय कमी आहेत, अशा मार्गांवर कंपनीचे लक्ष असणार आहे. विमान वाहतूक मंत्रालयाने याबाबत बोलताना सांगितले की, कंपनीला एफडीआय इत्यादीशी संबंधित तरतुदी आणि नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऑपरेशनसाठी दिलेली एनओसी तीन वर्षांच्या कालावधीसाठी वैध असणार आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
इंडिगो देशातील सर्वात मोठी विमान कंपनी
सध्या इंडिगो ही देशातील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. देशातील एव्हिएशन क्षेत्रामध्ये कंपनीचा वाटा सुमारे 63 टक्के इतका आहे. दरम्यान, टाटा समूहाचा भाग बनलेली दुसरी सर्वात मोठी विमान कंपनी एअर इंडियाचा विस्तारही वेगाने होत आहे. विस्तारा नोव्हेंबरमध्ये त्यात विलीन होणार आहे. तर एअर इंडिया एअर एशिया इंडियाचे अधिग्रहण करत आहे आणि एअर इंडिया एक्सप्रेसचे विलीनीकरण होणार आहे.
विमान सल्लागार फर्म सीएपीए इंडियाच्या रिपोर्टनुसार, भारताचा तिसरा सर्वात मोठा तिसरा देशांतर्गत विमान बाजार आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये देशातील एअर पैसेंजर ट्रॅफिकमध्ये 15 टक्के मजबूत वाढ नोंदवली गेली आहे. चालू आर्थिक वर्षात हवाई वाहतूक 6-8 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यासोबतच ही कंपनी 161 ते 164 गाव पैसेंजरपर्यंत पोहोचेल. समान इंटरनेशनल ट्रॅफिकमध्ये 9-11 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. हे मार्च 2025 पर्यंत 75 ते 78 पैसेंजर पर्यंत पोहोचेल.
दरम्यान, भारतामध्ये एअरलाइन बिजनेस सुरु करणे तितकेसे सोपे काम नाही. गेल्या एक दशकात अनेक एअरलाइन बंद झाल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने किंगफिशर एअरलाइंन्स, जेट एअरवेज आणि गो फर्स्ट या विमान वाहतुक कंपन्यांचा समावेश आहे. याशिवाय स्पाइसजेट ही कंपनी देखील आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करत आहे. सीएपीए इंडियाचा अंदाज आहे की, भारतीय एअरलाइन कंपन्या मार्च 2025 पर्यंत आपल्या ताफ्यामध्ये 84 नवीन विमान समाविष्ट करणार आहे. त्यामुळे आता देशांतर्गत सेवा देणाऱ्या विमानांची एकूण संख्या ८१२ झाली आहे.