आरबीआयचा मोठा निर्णय! आता UPI द्वारे 'या' बँकांकडूनही मिळणार कर्ज!
देशभरातील बॅंकांची शिखर संस्था असलेल्या भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) एक मोठा निर्णय घेतला आहे. आर्थिक घडामोडी वाढवण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँकेने आता लघु वित्त बँकांना कर्ज देण्याची परवानगी दिली आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे खेड्यापाड्यातील छोटे उद्योजक आणि व्यापाऱ्यांनाही परवडणाऱ्या व्याजदरात कर्जाची सुविधा मिळणार आहे. ग्रामीण भागातील आर्थिक विकासाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा निर्णय मानला जात आहे.
लघु वित्त बँकांशी जोडले जाणार नवीन ग्राहक
लघु वित्त बँकांसाठी ही एक अत्यंत चांगली बातमी आहे. UPI (UPI वर क्रेडिट लाइन) द्वारे कर्ज मिळणे या बँकांसाठी व्यवसायाचे नवीन मार्ग उघडणार आहे. एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड या भारतीय अनुसूचित व्यावसायिक लघु वित्त बँकेसारख्या छोट्या बॅंकांसाठी ही सकारात्मक बाब ठरणार आहे. एयू बँकेसारख्या अनेक लघु वित्त बँकांनी आधीच क्रेडिट कार्डद्वारे कर्ज देणे सुरू केले आहे. आता नवीन ग्राहकही या सोप्या पद्धतीने बँकांमध्ये सामील होऊ शकणार आहेत.
घसरणीसह शेअर बाजार बंद; आरबीआयच्या पतधोरणाचा परिणाम, वाचा… कोणते शेअर्स घसरले!
सुलभरित्या आर्थिक मदत मिळणार
UPI द्वारे कर्जाची सुविधा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास यामुळे मदत होणार आहे. यामुळे बँक आणि ग्राहक यांच्यातील व्यवहारही अधिक सुलभ होणार आहे. हे केवळ आर्थिक विकासाला चालना देत नाही तर समाजातील वंचित समुदायांना आवश्यकतेनुसार आर्थिक सहाय्य देखील प्रदान करणार आहे. अशा परिस्थितीत, या सुविधेमुळे वंचित घटकांना त्यांचे काम किंवा व्यवसाय कमी प्रमाणात सुरू करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. ज्यामुळे बाजारपेठेत आर्थिक क्रियाकलापांसह आर्थिक विकासाचे नवीन मार्ग खुले होतील. रोजगाराच्या नवीन संधी खुल्या होण्यास मदत होणार आहे.
सेबीकडून मिष्टान्न फूड्स लिमिटेडवर बंदी; बजावली कारणे दाखवा नोटीस!
या व्यावसायिकांना मोठी मदत होणार
भारतातील स्मॉल फायनान्स बँक ही बँकांची एक श्रेणी आहे. जी लहान व्यावसायिक, लघु आणि कुटीर उद्योगांना मूलभूत बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी तयार केली गेली आहे. या बँका बँकिंग नियमन कायदा, 1949 अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) द्वारे संचालित केले जाते. त्यांना आरबीआयकडून बॅंकिगचा परवाना देखील मिळतो.
आरबीआयचे पतधोरण जाहीर
भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज (6 डिसेंबर) पतधोरण जाहीर केले आहे. त्यात त्यांनी रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे रेपो रेट हा 6.5 टक्केच राहणार आहे. यासंदर्भात RBI गव्हर्नर म्हणाले की MPC सदस्यांनी 4:2 च्या बहुमताने हा निर्णय घेतला आहे. तर महागाई नियंत्रित करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रोख राखीव प्रमाण 0.50 टक्क्यांनी कमी केले आहे, जे आता 4 टक्के वर गेल्याचे पाहायला मिळत आहे.