Rice Price Update : तांदळाच्या दराबाबत मोठी बातमी! सरकारने अचानक लावला 20% Tax; सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार?

Rice Price Update : देशांतर्गत बाजारपेठेत तांदळाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने तांदळावर २० टक्के कर लावण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या धोरणामुळे देशांतर्गत बाजारातील तांदळाच्या दरांवर आणि शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होईल?
Photo - Social Media
Rice Price Update : Rice Price Update :
Published on: 
Updated on: 
  • तांदळाच्या दराबाबत मोठी बातमी!

  • सरकारने अचानक लावला 20% Tax

  • सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार?

Rice Price Update : जागतिक स्तरावरील तणावाची परिस्थिती आणि त्याचा सर्वच देशांवर होणारा परिणाम यामुळे महागाई बरीच फोफावली आहे. भारतात तर अन्नधान्याच्या किमती झपाट्याने वाढत आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या रोजच्या जीवनावर पडत आहे. दररोजच्या थाळीतील आवश्यक गोष्टींच्या किंमती बऱ्याच कडाडल्या आहेत. डाळी, तांदूळ आणि साखरेच्या किमती सातत्याने वाढत आहेत. या सगळ्या परिस्थितीचा वर नियंत्रण आणण्यासाठी सरकार नेहमी प्रयत्नशील असले. यावेळीही सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पण निर्णयाचा नेमका परिणाम काय होणार ? सविस्तर जाणून घेऊयात.

सरकारने देशांतर्गत बाजारात तांदळाच्या किमती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून, भारत सरकारने तांदळाच्या काही विशिष्ट जातींच्या निर्यातीवर २०% पर्यंत निर्यात शुल्क लावण्याचा विचार केला आहे. या सरकारी निर्णयाचा उद्देश देशात तांदळाची उपलब्धता वाढवणे आणि देशांतर्गत बाजारातील वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवणे हा आहे. हे शुल्क विशेषतः तुटलेल्या तांदळाच्या आणि बासमती व्यतिरिक्त इतर काही महागड्या तांदळाच्या जातींच्या निर्यातीवर लावले जाऊ शकते.

सरकारने का वाढवले निर्णाय शुल्क?

रॉयटर्सच्या एका अहवालानुसार, देशाच्या काही भागांमध्ये विशिष्ट प्रकारच्या तांदळाच्या किमती वाढल्या आहेत. काही दक्षिण राज्यांमध्ये उत्तम प्रतीच्या बासमती नसलेल्या तांदळाचा तुटवडाही निर्माण झाला आहे. शिवाय, तुटलेल्या तांदळाच्या वाढत्या किमतींमुळे कुक्कुटपालन आणि पशुखाद्य व्यवसायांवरही परिणाम होतो. त्याचा फटका बसल्यानंतर या क्षेत्रामध्येही महागाईची तीव्रता बरीच वाढत आहे. परिणामी, तांदळाचा अधिक साठा परदेशात निर्यात होण्याऐवजी देशांतर्गत बाजारात उपलब्ध व्हावा, जेणेकरून स्थानिक व्यवसाय, उद्योग आणि ग्राहकांना वाढत्या किमतींपासून दिलासा मिळेल, हे सरकारला सुनिश्चित करायचे आहे.

निर्यातवरही परिणाम होणार का?

जर सरकारने २०% निर्यात शुल्क लावले, तर भारतीय तांदळाची परदेशातील निर्यात अधिक महाग होऊ शकते. यामुळे निर्यातीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. पण, भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय तांदळाच्या किमती स्पर्धात्मक आहेत. त्यामुळे, निर्यात पूर्णपणे थांबवता येणार नाही. या निर्णयाचा फायदा थायलंड, व्हिएतनाम आणि म्यानमारसारख्या इतर तांदूळ निर्यात करणाऱ्या देशांना होऊ शकतो. भारतीय तांदळाच्या कमी किमतींमुळे या देशांना आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धा करणे कठीण जात होते.