रोटीमॅटिकचे भारतात पदार्पण; पूर्णत: ऑटोमॅटिक एआय-सक्षम रोटी मेकर ‘रोटीमॅटिक नेक्स्ट' केले लाँच (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
रोटीमॅटिक ही रोबोटिक्स व एआयचे पाठबळ असलेली जगातील पहिले स्मार्ट किचन अप्लायन्स कंपनी आहे. कंपनीचे अप्लायन्स ९० ते ११० सेकंदांमध्ये हँड्स-फ्री ताज्या रोटी (चपाती) बनवते. कंपनीने आज त्यांचे नेक्स्ट-जनरेशन मॉडेल रोटीमॅटिक नेक्स्टच्या लाँचसह भारतातील बहुप्रतिक्षित पदार्पणाची घोषणा केली. कंपनीचे मुख्यालय सिंगापूरमध्ये आहे, तर उत्पादन युनिट बेंगळुरू-म्हैसूर प्रांतामध्ये स्थलांतरित झाले आहे, ज्यामुळे जागतिक व भारतातील बाजारपेठांना सेवा दिली जाते.
२००८ मध्ये मेकॅनिकल इंजीनिअर प्रणोती नगरकर आणि सॉफ्टवेअर इंजीनिअर रिषी इसरानी यांनी स्थापना केलेल्या रोटीमॅटिकने यूएस, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, यूके, मध्य पूर्व येथील १ लाखाहून अधिक कुटुंबांमध्ये आधीच सोयीसुविधा दिल्या आहेत, जेथे आतापर्यंत २५० दशलक्षहून अधिक रोटी बनवण्यात आल्या आहेत.
भारतातील लाँच रोटीमॅटिकसाठी देशामध्ये मिळत असलेल्या मागणीमधून प्रेरित धोरणात्मक पाऊल आहे. यासह त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे की, भारत स्मार्ट किचन सोल्यूशन्ससाठी उच्च क्षमता असलेली बाजारपेठ आहे. भारतात अधिकृत पदार्पणासह रोटीमॅटिक नेक्स्ट केवळ कंपनीच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून डायरेक्ट-टू-कंझ्युमर मॉडेलद्वारे उपलब्ध असेल. हा डायरेक्ट-टू-कंझ्युमर दृष्टिकोन रोटीमॅटिकला भारतातील ग्राहकांना विनासायास, वैयक्तिकृत खरेदी अनुभव देण्यास सक्षम करतो, ज्यामध्ये समर्पित समर्थन, विशेष ऑफर व उत्पादनाच्या गुणवत्तेवर आणि वितरणावर पूर्ण नियंत्रण असते, तसेच तृतीय-पक्ष मध्यस्थांचा समावेश नसतो.
भारतातील लाँचबाबत मत व्यक्त करत झिम्प्लिस्टिक (रोटीमॅटिक)च्या संस्थापिका व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणोती नगरकर म्हणाल्या, “भारतात रोटीमॅटिक लाँच करणे अत्यंत वैयक्तिक अनुभव आहे. देशामध्ये दररोज गरमागरम, ताज्या रोटींचे सेवन केले जाते, ज्यामुळे भारतातील कुटुंबांना या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा अनुभव देण्याची वेळ आली आहे, ज्याने जागतिक स्तरावर १ लाख किचन्समध्ये बदल घडवून आणला आहे. या लाँचसह आम्ही सोयीसुविधा देण्यासोबत मेक इन इंडिया उत्कृष्टतेला प्रशंसित देखील करत आहोत, तसेच अभिमानाने उत्पादित केलेले दर्जात्मक उत्पादन वितरित करत आहोत, जे परंपरा जपण्यासह कूकिंग सोपे करते.”
झिम्प्लिस्टिक (रोटीमॅटिक)चे सह-संस्थापक व सीटीओ रिषी इसरानी म्हणाले, “रोटी बनवण्यासाठी आजही अधिक मेहनत करावी लागते, वेळ लागतो आणि अनेकदा कुटुंबातील एकाच व्यक्तीवर याची जबाबदारी असते. आपण राहत असलेल्या विश्वामध्ये एआय कारपासून संवादापर्यंत प्रत्येक गोष्टीत बदल घडवून आणत आहे, तरीदेखील दशकापासून रोटी बनवण्याच्या कृतीमध्ये बदल झालेला नाही. रोटीमॅटिक गॅझेट असण्यासोबत किचनमधील वेळेची बचत करतो. रोटीमॅटिक नेक्स्टसह आम्ही आमची सर्व माहिती व वापरकर्त्यांचे अभिप्राय घेतले आहेत आणि मर्यादांना दूर करत या उत्पादनाला अधिक सर्वोत्तम, विश्वसनीय व वैयक्तिकृत केले आहे.”
रोटीमॅटिक नेक्स्ट भारतीय स्वयंपाकघरातील सर्वात आवश्यक, पण वेळखाऊ काम स्वयंचलित करते, ते म्हणजे ताज्या रोट्या (चपात्या) बनवणे. दशकभराची नाविन्यता आणि ३७ हून अधिक पेटंटसह तयार केलेले हे नेक्स्ट-जनरेशन मॉडेल परंपरा व सोयीसुविधेला महत्त्व देणाऱ्या कुटुंबांमध्ये जलद कामगिरी, शांत कार्यचालन आणि स्मार्ट कार्यक्षमता आणते. पीठ मोजून घेण्यापासून मळणे ते लाटणे, फुगवणे आणि भाजणे यापर्यंत हे उत्पादन थोड्या वेळेसाठी वॉर्म-अप केल्यानंतर दर ९० सेकंदांनी परिपूर्णपणे शिजवलेली चपाती देते. सर्वांसाठी चपाती बनवणे व उपलब्ध करून देणे सोपे करत रोटीमॅटिक नेक्स्टमध्ये किचनमधील पारंपारिक चपाती बनवण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. यामधून सिद्ध होते की भारतीय काळजी, संस्कृती आणि दैनंदिन सहजतेचा आदर करणारी प्रीमियम अप्लायन्सेस स्वीकारण्यास तयार आहेत.
रोटीमॅटिक नेक्स्टला वरचढ ठरवणारी बाब म्हणजे बिल्ट-इन एआय आणि आयओटी क्षमता, ज्यामुळे हे अप्लायन्स नियमित ओव्हर-द-एअर अपडेट्ससह शिकण्यास आणि विकसित होण्यास सक्षम आहे. व्हिजन एआय आणि नेक्स्ट-जनरेशन नीडिंग इंटेलिजेंससह सुधारित ते आता पातळ, मऊ आणि अधिक वैविध्यपूर्ण बहुस्तरीय चपात्या बनवते, ज्यावर सर्वोत्तम ३.५-इंच एलसीडी टचस्क्रिन किंवा कनेक्टेड मोबाइल अॅपच्या माध्यमातून नियंत्रण ठेवता येते.
चपात्यांव्यतिरिक्त हे अप्लायन्स पराठे, भाकरी व पुऱ्या, तसेच टॉर्टिला, रॅप्स व पिझ्झा बेससह विविध प्रकारचे फ्लॅटब्रेड सहजतेने तयार करू शकते. ते बदाम, मका, ज्वारी आणि बाजरी यांसारखे मल्टीग्रेन पीठ, स्टोअरमधून विकत घेतलेले ग्लूटेन-मुक्त किंवा कमी साखरेचे प्रकार आणि तपकिरी तांदूळ किंवा ज्वारीच्या पिठापासून बनवलेले उच्चफायबर मिश्रण यांचा वापर करून आरोग्यदायी पर्याय देखील देते. या अप्लायनस्मधील पीठ, पाणी आणि तेलासाठी असलेले घटक कंटेनर पुन्हा भरणे सोपे आहे, पीठाच्या एका लोडसह जवळपास १५ ताज्या चपाती मिळतात.
१६००-१८०० वॅटची शक्तिशाली हीटिंग सिस्टम २६५ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत रोट्या शिजवते, तर ६० डेसिबलपेक्षा कमी आवाजाची पातळी राखते. जवळपास १९ किलो वजन असलेले रोटीमॅटिक नेक्स्ट सहजपणे वापरता येते आणि साफ करता येते. दरवाजा उघडल्यावर ऑटो शटऑफ सारख्या अंतर्गत सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे कोणत्याही किचनमध्ये सुरक्षिततेची खात्री मिळते.
आकर्षक डिझाइन, स्मार्ट वैशिष्ट्ये आणि वैविध्यतेसह रोटीमॅटिक नेक्स्ट रोटी मेकरपेक्षा अधिक असून किचनमधील गेम-चेंजिंग सोबती आहे. मूळ किंमत १,६५,९९९ रूपये आहे, पण रोटीमॅटिक नेक्स्ट मर्यादित कालावधीसाठी १,२४,९९ रूपयांच्या लाँच किमतीत उपलब्ध असेल. हे अप्लायन्स आता संपूर्ण भारतात अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Foseco India ची मजबूत बाजार कामगिरी, शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर; जाणून घ्या