केनस्टारकडून ५ वर्षे वॉरंटी असलेली भारतातील पहिली ऊर्जा कार्यक्षम ५-स्टार प्रमाणित एअर कूलर श्रेणी लाँच (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
केनस्टार या जवळपास तीन दशकांपासून भारतातील सर्वात विश्वसनीय ब्रँडने आज गुरूग्राम, हरियाणामध्ये भारतामधील पहिल्या ५ स्टार बीईई प्रमाणित ऊर्जा कार्यक्षम एअर कूलर्सच्या व्यापक श्रेणीच्या लाँचची घोषणा केली. कूलर्सची नवीन श्रेणी अद्वितीय समाधानासह येते, जेथे ५-वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. ही अत्याधुनिक नाविन्यता केनस्टारची मोहिम ‘द पॉवर ऑफ ५’ला प्रबळ करते, जी शाश्वता व ऊर्जा कार्यक्षमतेप्रती ब्रँडची कटिबद्धता अधिक दृढ करत आहे, तसेच तडजोड न करणारी कूलिंग कार्यक्षमता देत आहे आणि ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ करत आहे.
केनस्टारमध्ये नाविन्यता फक्त तंत्रज्ञानाबद्दल नाही, तर ग्राहकांचे राहणीमान उत्साहित करण्याबद्दल, विश्वास वाढवण्याबद्दल आणि कायमस्वरूपी मूल्य निर्माण करण्याबद्दल आहे. एअर कूलर्सच्या या नवीन श्रेणीमध्ये ही नवीन श्रेणी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह ऊर्जा कार्यक्षमतेचे संयोजन आहे, ज्यामधून वीज बिलांमध्ये बचत होण्यासोबत उत्कृष्ट कूलिंग कामगिरीची खात्री मिळते.
Foseco India ची मजबूत बाजार कामगिरी, शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर; जाणून घ्या
द पॉवर ऑफ ५ सह कूलर्समध्ये BLDC Maxx Technology, शक्तिशाली एअर डिलिव्हरीसाठी Quadra Flow Technology, अधिक कूलिंग व टिकाऊपणासाठी Hydro Dense Mesh Honeycomb Cooling Pads आणि प्रबळ कार्यक्षमता व दीर्घकाळपर्यंत कार्यरत राहण्यासाठी Heavy Duty & Double Ball Bearing Motor आहे.
याप्रसंगी मत व्यक्त करत केनस्टारचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल जैन म्हणाले, “नवीन लाँच करण्यात आलेल्या बीईई ५-स्टार प्रमाणित केनस्टार कूलर्स श्रेणीमधून शाश्वततेप्रती आमची अविरत कटिबद्धता दिसून येते. तसेच ही श्रेणी भारत सरकारच्या हरित व ऊर्जा-कार्यक्षम भविष्याप्रती दृष्टिकोनाशी संलग्न आहे. केनस्टारमध्ये आमचा विश्वास आहे की खरे यश आम्ही संपादित करणाऱ्या उपलब्धींमधून नाही तर आम्ही सेवा देत असलेल्या ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याच्या आमच्या प्रयत्नांमधून मिळते. आम्ही डिझाइन करणारा प्रत्येक अप्लायन्स अचूकता, दर्जा आणि दैनंदिन राहणीमान उत्साहित करण्याच्या कटिबद्धतेसह तयार केले जातात. द पॉवर ऑफ ५ अद्वितीय कार्यक्षमतेसह दर्जात्मक कार्यक्षमता, तडजोड न करणारा दर्जा, अपवादात्मक टिकाऊपणा आणि आम्ही सेवा देणाऱ्या प्रत्येक घरामध्ये विश्वसनीयता आणण्याच्या कटिबद्धतेला एकत्र आणण्याप्रती आमच्या समर्पिततेशी परिपूर्णपणे संलग्न आहे.”
केनस्टारचे राष्ट्रीय विक्री प्रमुख संतोष भामरे म्हणाले, “आम्हाला भारतातील पहिली ५ स्टार प्रमाणित एअर कूलर श्रेणी लाँच करण्याचा आनंद होत आहे. हे यश आमच्या ग्राहकांच्या विश्वासाला अधिक दृढ करेल, त्यांना खरेदीदरम्यान अधिक योग्यरित्या निर्णय घेण्यास सक्षम करेल. या मान्यतेसह ५ वर्षांच्या वॉरंटीमधून तंत्रज्ञान नाविन्यता, उच्च दर्जाची ऊर्जा कार्यक्षमता आणि दर्जाबाबत तडजोड न करता स्पर्धात्मकरित्या आकर्षक दरांमध्ये उत्पादने वितरित करण्याप्रती केनस्टरची कटिबद्धता दिसून येते.”
गेल्या २९ वर्षांपासून केनस्टार उत्पादने वितरित करत आहे, ज्यामध्ये दर्जा, नाविन्यता व विश्वसनीयतेचा समावेश आहे आणि ग्राहकांचे जीवन उत्साहपूर्ण करत आहेत. या नवीन लाँचसह ब्रँडने भारतातील कुटुंबांच्या गरजांची पूर्तता करण्यासोबत त्यापलीकडे जाणारी अप्लायन्सेस उत्पादित करण्याप्रती आपली कटिबद्धता कायम ठेवली आहे.
विश्वास, दर्जा व साततत्येवर निर्माण करण्यात आलेल्या वारसासह केनस्टारचे नवीन आविष्कार होम अप्लायन्स क्षेत्रातील त्यांच्या नेतृत्वाला अधिक दृढ करतात.
द पॉवर ऑफ ५ एअरकूलर्सचे लाँच भारतातील कुटुंबांच्या जीवनात आनंद, आरामदायीपणा व कार्यक्षमता आणण्याप्रती ब्रँडच्या प्रवासामधील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. विविध ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या व्यापक कूलर श्रेणीमध्ये स्टाइल, कार्यक्षमता व नाविन्यतेचे परिपूर्ण संयोजन आहे, जी कूलिंग सोल्यूशन्समध्ये नवीन मापदंड स्थापित करत आहे.