शेअर बाजारात घोटाळा... झिरोधाचे सह संस्थापक नितीन कामथ यांचा एक्स वर खुलासा
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र, शेअर बाजारात आर्थिक फायदा होत असला तरी अनेकांना मोठा आर्थिक तोटा देखील सहन करावा लागतो. मात्र, असे असतानाच आता शेअर बाजारात नवीन घोटाळा समोर आला आहे. आता तुम्ही विचारात पडला असाल की, शेअर बाजारात घोटाळा कसा होऊ शकतो. तर याबाबत झिरोधाचे सह संस्थापक नितीन कामथ यांनी माहिती आणली आहे. त्यामुळे आता हा घोटाळा नेमका कसा होत आहे? तो कोणामार्फत होत आहे. कोण आता घोटाळा करत आहे. याबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
कसा होतोय शेअर बाजारात घोटाळा
खोट्या ट्रेडिंग अॅप्सच्या माध्यमातून हा घोटाळा होत आहे. हे अॅप्स आघाडीच्या ब्रोकर कंपन्याची नक्कल करत असल्याचा खुलासा कामथ यांनी केला आहे. त्यामुळे आता कामथ यांनी गुंतवणूकदारांना याबाबत सावध केले आहे. हे बनावट ट्रेडिंग अॅप्स शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना लवकर श्रीमंत होण्याचा मार्ग सांगतात. त्यातूनच हे अॅप्स गुंतवणूकदारांची फसवणूक करतात. हे बनावट ट्रेडिंग अॅप्सचा फुगा फुटला आहे. हे अॅप्स गुंतवणुकदार आणि शेअर बाजारासाठी डोकेदुखी ठरत आहेत. असे कामथ यांनी म्हटले आहे. झिरोधाचे सह संस्थापक नितीन कामथ यांनी एक्स या समाजमाध्यमावर ही माहिती दिली आहे.
Fake trading app scams have exploded and have become a mega nuisance.
These scams work by inducing you to trade and making you think that making money is easy. So first, you are added to WhatsApp groups and then asked to install fake trading apps that look exactly like those of… pic.twitter.com/3CXHVq3Hj0
— Nithin Kamath (@Nithin0dha) August 26, 2024
ब्रोकर्ससारखे दिसणारे बनावट अॅप्स
ही खोटी ट्रेडिंग अॅप्स गुंतवणूकदारांना शेअर बाजारात व्यवहार करण्यास प्रवृत्त करतात. कमी काळात जास्त नफा देण्याचे अमिष दाखवतात. या मध्यमातून फसवणूक होते. सुरुवातीला हे बनावट अॅप्स गुंतवणूकदारांना त्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करुन घेतात. त्यानंतर मोठ्या ब्रोकर्ससारखे दिसणारे बनावट ट्रेडिंग अॅप्स मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगतात. यानंतर गुंतवणूकदार या अॅप्सच्या माध्यमातून व्यापार करतो.
सुशिक्षीत लोकही पडतायेत बळी
विशेष म्हणजे सुरुवातीच्या काही काळात गुंतवणूकदार या अॅप्सच्या माध्यमातून चांगले पैसे देखील कमावतो. यानंतर गुंतवणूकदाराला पैसे मिळत असल्याची खात्री पटते. या माध्यमातून आपण भरपूर पैसे मिळवू शकतो, असा त्याचा समज होतो. काही काळानंतर निधी हस्तांतरीत करण्यास सांगितले जाते. गुंतवणूकदाराला प्रथम फी, कर इत्यादी भरण्यास सांगितले जाते आणि काळी वेळाने तो संपूर्ण ग्रुप गायब होतो. अशा प्रकारे शेअर मार्केट घोटाळा होत असल्याचे कामथ यांनी एक्स माध्यमावरील माहितीत म्हटले आहे. विशेष म्हणजे यास सुशिक्षीत लोकही सहज बळी पडत आहेत. असेही त्यांनी शेवटी नमुद केले आहे.