फोटो सौजन्य: Social Media
आज देशात अनेक महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चांगली कामगिरी करत आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला कार्यरत आहे. तसेच कित्येक जणी यशस्वीरीत्या आपल्या स्वतःचा बिजनेस सांभाळत आहे. या महिला फक्त देश कणखर बनवत नाही आहेत, तर येणाऱ्या पिढीस प्रोत्सहन देखील देत आहे. आज आपण अशाच एका महिलेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी नुकतेच स्वप्नांच्या नगरीत म्हणजेच मुंबईत आलिशान घर विकत घेतले आहे. त्यांना बिहारची सुनबाई देखील म्हणून सुद्धा ओळखतात.
जेव्हा जेव्हा बिहारचा विषय येतो तेव्हा लोकांच्या मनात सर्वात आधी गरिबी, बेरोजगारी किंवा कामासाठी घरे सोडणाऱ्या लोकांच्या प्रतिमा तयार होतात. पण, जर आपण म्हटले की याच बिहारमधून जगात आपला ठसा उमटवणारे श्रीमंत लोक सुद्धा येतात, तर तुम्ही काय म्हणाल?
Mirae Asset Small Cap Fund गुंतवणुकीसाठी खुला, ‘या’ तारखेला होणार सब्स्क्रिप्शन बंद
वेदांत ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांना आपण सगळेच ओळखतो. त्यांचे नाव भारतातील सर्वोच्च श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जाते. ते देखील बिहारचे आहेत. पण आज आपण ज्या महिलेबद्दल जाणून घेणार आहोत ती बिहारची सून असण्यासोबतच देशातील एका मोठ्या कंपनीची मालक देखील आहे. अलिकडेच त्यांनी मुंबईत तब्बल 185 कोटी रुपयांचा पेंटहाऊस खरेदी केला आहे.
आपण ज्या महिलेबद्दल बोलत आहोत तिचे नाव सीमा सिंह आहे. अलिकडेच सिंहने मुंबईतील वरळी परिसरात एक आलिशान पेंटहाऊस खरेदी केले आहे, ज्याची किंमत 185 कोटी रुपये आहे. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्यांनुसार, सीमा सिंहचे हे घर बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या घर मन्नतच्या किंमतीपेक्षा फक्त १५ कोटी रुपये कमी आहे. आलिशान घरासोबतच सीमा सिंगने ९ गाड्यांसाठी पार्किंगची जागाही खरेदी केली आहे. यासाठी त्यांनी ९.२५ कोटी रुपये दिले आहेत. चला, आता आपण जाणून घेऊया की सीमा सिंह बिहारमधील कोणत्या कुटुंबाची सून आहे.
Union Budget 2025: गृहकर्ज व्याजावर आयकर सवलतीची मर्यादा वाढणार? सरकार करू शकते ‘ही’ घोषणा
सीमा सिंग ही बिहारमधील जहानाबाद येथील रहिवासी संप्रदा सिंग आणि वासुदेव नारायण सिंग यांची सून आहे. हे दोघेही अल्केम लॅबोरेटरीज नावाच्या कंपनीचे प्रमोटर आहेत. सध्या सीमा सिंग या कंपनीची देखभाल करत आहेत. अल्केम लॅबोरेटरीज ही एक पब्लिक लिस्टेड कंपनी आहे, म्हणजेच ती भारतीय शेअर बाजारात लिस्टेड आहे आणि लोक या कंपनीचे शेअर्स सहजपणे खरेदी करू शकतात.
अल्केम लॅबोरेटरीज बीएसई आणि एनएसई दोन्हीवर लिस्टेड आहेत. सध्या, अल्केम लॅबोरेटरीजच्या एका शेअरची किंमत ५३३६ रुपये आहे. त्याच वेळी, जर आपण या कंपनीच्या मार्केट कॅपबद्दल बोललो तर ते ६३,८०० कोटी रुपये आहे.