'ही' सरकारी कंपनी एका शेअरवर 2 बाेनस शेअर्स; 'ही' असेल रेकाॅर्ड तारीख, वाचा... सविस्तर!
मल्टीबॅगर स्टॉक धानी सर्व्हिसेसच्या शेअर्सच्या किंमतीत शुक्रवारी (ता.७) 6 डिसेंबर राेजी 15 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्सने 97.80 रुपयांची पातळी गाठली होती. बाजार बंद हाेताना कंपनीचे शेअर्स मुंबई शेअर बाजारात (बीएसई) 10 टक्क्यांहून अधिक वाढीसह 93.18 रुपयांच्या पातळीवर होते. या शेअर्सने गुंतवणूकदारांना 24 टक्क्यांहून अधिक नफा मिळवून दिला आहे.
2 महिन्यांत पैसे दुप्पट
धनी सर्व्हिसेसच्या शेअर्सने मागील 2 महिन्यांत गुंतवणूकदारांना 107 टक्के परतावा दिला आहे. दाेन महिन्यांपूर्वी धानी सर्व्हिसेसच्या शेअरची किंमत 47.17 रुपये होती. आता शेअर्स 93.18 रुपयांवर पाेहाेचला आहे. शेअर्सची 52 आठवड्यांची निच्चांकी पातळी 33.30 रुपये इतकी आहे.
‘या’ राज्यात वीज महागली; सरकारचा मोठा निर्णय, पुढील वर्षीही होणार वीज दरात वाढ!
दुसऱ्या तिमाहीत नफा
जुलै ते सप्टेंबर या कालावधीत धानी सर्व्हिसेसला 4.19 कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा 104.94 कोटी रुपये होता. पहिल्या तिमाहीत कंपनीचा तोटा 83.34 कोटी रुपये होता. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल 102.63 कोटी रुपये होता. तर गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल 98.57 कोटी रुपये होता.
गेल्या 2 वर्षात या धानी सर्व्हिसेसच्या शेअरची किंमत 101 टक्क्यांनी वाढली आहे. तर गेल्या 5 वर्षांपासून धनी सर्व्हिसेसचे शेअर्स धारण करणाऱ्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत 40 टक्के तोटा सहन करावा लागला आहे. या काळात सेन्सेक्स 102 टक्क्यांनी वाढला आहे.
गुंतवणुकीची संधी! 11 डिसेंबरला खुला होणार ‘हा’ तगडा आयपीओ, वाचा… कितीये किंमत पट्टा
काय करते ही कंपनी
धनी सर्व्हिसेस लि. ही भारतातील एक प्रमुख फायनान्शियल टेक्नॉलॉजी कंपनी आहे, जी पर्सनल लोन्स, इन्श्युरन्स आणि टेलिमेडिसिनसह डिजिटल फायनान्शियल सर्व्हिसेसची श्रेणी प्रदान करते. कंपनी नाविन्यपूर्ण उपाय आणि यूजर-फ्रेंडली मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे कस्टमरचा अनुभव वाढविण्यावर लक्ष केंद्रित करते. धनी सर्व्हिसेसचा ट्रेलिंग 12-महिन्याच्या आधारावर 414.68 कोटींचा ऑपरेटिंग रेव्हेन्यू आहे. धनी सर्व्हिसेस लि. हा ग्राहक व्यवसाय धनी ॲपद्वारे चालतो. ज्याद्वारे ग्राहकांना डिजिटल आरोग्य सेवा आणि डिजिटल वित्तपुरवठा केला जातो.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)