कोयना प्रकल्पातून विक्रमी वीजनिर्मिती (File Photo : Electricity)
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमुळे राजकिय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. त्यानंतर गेले सत्तापेच निर्माण झाला होता. मात्र, आता राज्यात महायुतीचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. अशातच एका राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. दक्षिणेकडील राज्य असलेल्या या राज्यात जनतेला आतापासून वीज बिलासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
विजेच्या दरात प्रति युनिट 16 पैसे आणि 12 पैसे वाढ
केरळ सरकारने शुक्रवारी (ता.७) 2024-25 या आर्थिक वर्षासाठी विजेच्या दरात प्रति युनिट 16 पैसे आणि 12 पैसे वाढ करण्याची घोषणा केली. हे 5 डिसेंबरपासून प्रभावी लागू होणार आहेत. केरळच्या ग्राहकांसाठी ही वाढ इथेच थांबणार नाही. केरळमध्ये 2025-26 या आर्थिक वर्षात प्रति युनिट 12 पैसे अतिरिक्त वाढ होणार आहे. त्यामुळे आता केरळमधील जनतेला वीजेचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
केरळमध्ये पिनाराई विजयन सरकारने सन 2016 मध्ये कार्यभार स्वीकारल्यापासून म्हणजेच 2016 मध्ये विद्यमान सरकार सत्तेत आल्यापासून ग्राहकांवर आर्थिक बोजा पडू लागल्याने, त्यांच्या एकूण कार्यकाळात पाचव्यांदा वीजदर वाढवण्यात आले आहेत. अर्थात मागील आठ वर्षात केरळमध्ये वीजेचे दर पाचपट महाग झाले आहे.
नारायण मूर्तींनी खरेदी केले ‘या’ दिवाळखोर उद्योगपतीचे आलीशान घर; किंमत वाचून चक्रावून जाल!
वीज दरवाढीबाबत सरकार काय म्हणते?
वीज मंत्री के कृष्णनकुट्टी यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित करताना सांगितले की, वीज दरात झालेली वाढ अत्यल्प आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर कोणताही परिणाम होणार नाही. केरळ राज्य विद्युत मंडळाने सुरुवातीला 2024-25 साठी 37 पैसे प्रति युनिट आणि 2025-26 साठी 27 पैसे प्रति युनिट वाढ करण्याची विनंती केली होती. परंतु वीज नियामक आयोगाने केवळ 16 पैसे आणि 12 पैसे प्रति युनिटने वाढ करण्यास मान्यता दिली आहे. याशिवाय केएसईबीने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी प्रति युनिट नऊ पैसे प्रस्तावित वाढीची विनंती केली होती, ज्याला वीज नियामकाने नकार दिला आहे.
गुंतवणुकीची संधी! 11 डिसेंबरला खुला होणार ‘हा’ तगडा आयपीओ, वाचा… कितीये किंमत पट्टा
कोणत्या ग्राहकांना महागडे विजेचे दर लागू होतील?
वीज दरातील वाढ सर्व ग्राहकांना लागू आहे. जे दरमहा 40 युनिटपेक्षा जास्त वीज वापरतात. ज्यांचे जोडलेले लोड 1000 वॅटपेक्षा जास्त आहे. याबाबत के कृष्णकुट्टी म्हणाले आहे की, बाह्य स्त्रोतांकडून खरेदी केलेल्या विजेची किंमत कमी झाल्यास त्याचा फायदा राज्यातील ग्राहकांपर्यंत पोहोचेल. सौरऊर्जेची वाढती उपलब्धता लक्षात घेता, राज्यात दिवसा 250 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना 10 टक्के कमी दराने वीज मिळणार आहे.