पुण्याची वस्त्रोद्योग क्षेत्रातील कंपनी पहिल्यांदाच देणार बोनस शेअर; गुंतवणूकदारांना दिलासा?
मागील काही दिवसांत शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) सेन्सेक्सने तब्बल ८२५९४ अंकांच्या पातळीपर्यंत उसळी घेतलेली पाहायला मिळाली होती. अशातच आता चालू आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.३) शेअर बाजारात काहीसा चढ-उतार पाहायला मिळाला आहे.
शेअर बाजार समान पातळीवर बंद
आज (ता.३) सकाळी शेअर बाजार उघडताच काहीशी घसरण दिसून आली. तर दिवसभर देखील भारतीय शेअर बाजारात चढ-उतार सुरुच होते. मात्र, बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स ४.४१ अंकांच्या अल्पशा घसरणीसह ८२,५५५.४४ अंकांवर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी (एनएसई) हा १.१५ अंकांच्या २५,२७९.८५ अंकांवर बंद झाला आहे. त्यामुळे आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये कभी खुशी कभी गम असे वातावरण पाहायला मिळाले.
(फोटो सौजन्य – istock)
आज शेअर बाजारात प्रामुख्याने मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 12 शेअर्स वाढीसह तर 18 शेअर घसरणीसह बंद झाले आहे. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 21 शेअर्स हे वाढीसह आणि 29 शेअर्स हे घसरणीसह बंद झाले आहेत. मुंबई शेअर बाजारात आज एकूण 4054 शेअर्सचे व्यवहार झाले. ज्यामध्ये 2011 शेअर्स हे वाढीसह बंद झाले. तर 1925 शेअर्स घसरणीसह बंद झाले. 118 शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
हे देखील वाचा – विकायला काढली होती सरकारने ‘ही’ कंपनी; तिनेच मिळवून दिलाय सरकारला 2,413 कोटींचा लाभ!
कोणते शेअर्स घसरले, कोणते तेजीत
आज शेअर बाजारात तेजीत असलेल्या शेअर्समध्ये आयसीआयसीआय बँक 1.37 टक्के, बजाज फिनसर्व्ह 1.30 टक्के, टायटन 0.85 टक्के, नेस्ले 0.75 टक्के, एचडीएफसी बँक 0.72 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 0.25 टक्के, एसबीआय 0.23 टक्के, एल अँड टी 0.23 टक्के, कोटक महिंद्रा बॅंक 1 टक्के वाढीसह व्यवहार करत होते. तर घसरलेल्या शेअर्समध्ये बजाज फायनान्स १.२९ टक्के, इन्फोसिस १.२८ टक्के, अदानी पोर्ट्स ०.९९ टक्के, एचसीएल टेक ०.९५ टक्के, भारती एअरटेल ०.८२ टक्क्यांनी घसरले आहेत.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)