Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

HDFC-ICICI Bank बॅंकेचे गुंतवणूकदार मालामाल; 5 दिवसांत कमावलेत 50000 कोटी रुपये!

गेल्या आठवड्यात सेन्सेक्समध्ये नफा कमावणाऱ्या चार कंपन्यांमध्ये तीन बँका आहेत. तर एक दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी देखील आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 20, 2024 | 07:51 PM
'या' पेनी स्टॉकमुळे गुंतवणूकदार मालामाल; वर्षभरात दिला तब्बल 52 हजार टक्के परतावा!

'या' पेनी स्टॉकमुळे गुंतवणूकदार मालामाल; वर्षभरात दिला तब्बल 52 हजार टक्के परतावा!

Follow Us
Close
Follow Us:

शेअर बाजारात कोणता शेअर कधी झेप घेईल आणि गुंतवणूकदारांवर पैशांचा वर्षाव करेल, हे सांगता येत नाही. बँकिंग शेअर्संनी गेल्या आठवड्यात अशीच कामगिरी करून दाखवली आहे. यामध्ये आयसीआयसीआय बँकेच्या गुंतवणूकदारांनी अवघ्या पाच दिवसांत 28,000 कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर दुसरीकडे देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या शेअर धारकांच्या संपत्तीत सुमारे 23,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

टॉप 10 पैकी चार कंपन्यांना फायदा

गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठी चढ-उतार पाहायला मिळाला. ज्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) 30 समभागांच्या सेन्सेक्समधील टॉप-10 मध्ये चार कंपन्यांच्या बाजार भांडवलात (मार्केट कॅप) मोठी वाढ झाली आहे. तर सहा टॉप कंपन्यांचे नुकसान झाले आहे. ज्या चार कंपन्यांचे बाजारमूल्य वाढले आहे. त्यांच्या एकत्रित मार्केट कॅपमध्ये 81,151.31 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर धारकांना सर्वाधिक फायदा झाला आहे.

हे देखील वाचा – तरुणांसाठी आनंदाची बातमी..! सीएसआर निधी पीएम इंटर्नशिप योजनेसाठी खर्च केला जाणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

एक दूरसंचार कंपनीचाही फायदा

गेल्या आठवड्यात सेन्सेक्समध्ये नफा कमावणाऱ्या चार कंपन्यांमध्ये तीन बँका आहेत. तर एक दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी देखील आहे. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) सोबतच भारती एअरटेलचे मार्केट कॅप वाढले आहे. दुसरीकडे, मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL), टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL), आयटीसी आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यांचे बाजारमूल्य घसरले आहे.

आयसीआयसीआय बँक अव्वल स्थानावर

गेल्या आठवड्यात खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक मार्केट कॅपमध्ये 28,495.14 कोटी रुपयांच्या उडीसह सर्वोच्च स्थानी राहिली आहे. कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 8,90,191.38 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली. यासह एचडीएफसी बँकेचा एमसीकॅप 12,82,848.30 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. या बँकेच्या शेअर धारकांनी केवळ पाच दिवसांत 23,579.11 कोटी रुपये छापले आहेत. एसबीआय बॅंकेचे मार्केट कॅप 17,804.61 कोटींनी वाढून, 7,31,773.56 कोटींवर रुपयांवर पोहोचले आहे. तर भारती एअरटेल या कंपनीचे बाजारमूल्य 11,272.45 कोटींनी वाढून, 9,71,707.61 कोटी रुपये इतके झाले आहे.

रिलायन्स कंपनीचा दबदबा कायम

गेल्या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपमध्ये घसरण झाली असली तरी, टॉप-10 व्हॅल्युएबल फर्म्सच्या यादीत तिचा दबदबा कायम आहे. मुकेश अंबानींची ही कंपनी पहिल्या क्रमांकावर कायम आहे. यानंतर TCS, HDFC बँक, भारती एअरटेल, ICICI बँक, Infosys, SBI, हिंदुस्तान युनिलिव्हर, ITC आणि LIC यांना क्रमवारीत स्थान मिळाले आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Stock market today hdfc icici banks investor portfolio earned rs 50000 crore in 5 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2024 | 07:49 PM

Topics:  

  • share market

संबंधित बातम्या

Superhit IPOs of 2025: 2025 चे IPO हिट की फ्लॉप? या आयपीओंनी केले गुंतवणूकदारांना मालामाल 
1

Superhit IPOs of 2025: 2025 चे IPO हिट की फ्लॉप? या आयपीओंनी केले गुंतवणूकदारांना मालामाल 

देशाचा विकास मंदावला! आयपीओ बाजारात लुटमार, रुपया कमकुवत, मंदीचा धोका
2

देशाचा विकास मंदावला! आयपीओ बाजारात लुटमार, रुपया कमकुवत, मंदीचा धोका

Stock Market Today: या शेअर्सवर असणार आज गुंतवणूकदारांची नजर, तज्ज्ञांनी केली शिफारस! जाणून घ्या सविस्तर
3

Stock Market Today: या शेअर्सवर असणार आज गुंतवणूकदारांची नजर, तज्ज्ञांनी केली शिफारस! जाणून घ्या सविस्तर

Multibagger Small Cap Stock : हे ५ स्मॉल-कॅप स्टॉक्स २०२५ चे ‘धुरंधर’ ठरले, ज्यांनी ४९० टक्क्यांपर्यंत दिला परतावा
4

Multibagger Small Cap Stock : हे ५ स्मॉल-कॅप स्टॉक्स २०२५ चे ‘धुरंधर’ ठरले, ज्यांनी ४९० टक्क्यांपर्यंत दिला परतावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.