Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: गुंतवणूकदारांनो… एपीएल अपोलोसह ‘या’ शेअर्सवर ठेवा तुमचं लक्ष, बाजारातील तज्ज्ञांनी केली शिफारस

Share Market Update: शेअर बाजारात आज नकारात्मक सुरुवात होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. भारतीय शेअर बाजारातील तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी काही महत्त्वाच्या शेअर्सची शिफारस केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 06, 2026 | 09:00 AM
Stock Market Today: गुंतवणूकदारांनो... एपीएल अपोलोसह 'या' शेअर्सवर ठेवा तुमचं लक्ष, बाजारातील तज्ज्ञांनी केली शिफारस

Stock Market Today: गुंतवणूकदारांनो... एपीएल अपोलोसह 'या' शेअर्सवर ठेवा तुमचं लक्ष, बाजारातील तज्ज्ञांनी केली शिफारस

Follow Us
Follow Us:
  • भारतीय शेअर बाजार नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता
  • सुमारे २०० कंपन्या तिमाहीचे आर्थिक निकाल शुक्रवारी जाहीर करतील
  • तीन दिवसांच्या तेजीनंतर गुरुवारी शेअर बाजार घसरला
India Share Market Update:   जागतिक बाजारपेठेत कमकुवतपणा पाहायला मिळत आहे. अमेरिकन टेक स्टॉक्समध्ये सतत विक्री झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० आज शुक्रवारी सपाट किंवा नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी आज नकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,६०९ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ११५ अंकांनी कमी होता.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या किंमती वाढल्या की घसरल्या? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या सविस्तर

गुरुवारी, भारतीय शेअर बाजार घसरला, बेंचमार्क निफ्टी ५० २५,७०० च्या खाली बंद झाला. सेन्सेक्स ५०३.७६ अंकांनी म्हणजेच ०.६०% ने घसरून ८३,३१३.९३ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १३३.२० अंकांनी म्हणजेच ०.५२% ने घसरून २५,६४२.८० वर बंद झाला. गुरुवारी बँक निफ्टी निर्देशांक १७४.५० अंकांनी किंवा ०.२९% ने घसरून ६०,०६३.६५ वर बंद झाला. शेअर बाजारात सुरु असलेल्या तीन दिवसांच्या तेजीनंतर गुरुवारी शेअर बाजार घसरला. (फोटो सौजन्य – Pinterest) 

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आजच्या व्यवहारात गुंतणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. सुमित बगाडिया यांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये एपीएल अपोलो, लुपिन, सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजीज, डीमार्ट आणि एचएफसीएल यांचा समावेश आहे. रेलिगेअर ब्रोकिंग येथील संशोधन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी अत्पाकालीन खरेदीसाठी गुंतणूकदारांना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी), इंडस टॉवर्स, आरईसी लिमिटेड या स्टॉक्सची शिफारस केली आहे.

आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार भारती एअरटेल, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स, हिरो मोटोकॉर्प, रेल विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल), फेडरल बँक, अल्ट्राटेक सिमेंट, बर्जर पेंट्स, फिजिक्सवाल्लाह, एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स (न्याका) आणि इतर स्टॉक्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया आणि आनंद राठीचे तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी आज शुक्रवारी शेअर बाजारात व्यवहार करतानाह गुंतणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच इंट्राडे स्टॉक्स सुचवले आहेत. तज्ज्ञांनी केलेल्या शिफारसीनुसार, गुंतवणूकदार जीईशिप, आयओसी, पीएनबी, पॉली मेडिक्योर आणि यूपीएल शेअर्सवर त्यांचा फोकस ठेऊ शकतात.

Jio BlackRock Partnership: भारताच्या म्युच्युअल फंड क्षेत्रात खळबळ! अंबानी–फिंक यांच्या भागीदारीला सेबीची मान्यता 

टाटा स्टील , कल्याण ज्वेलर्स , एमआरएफ , बीईएमएल , सन टीव्ही , बॉश , सेंटम इलेक्ट्रॉनिक्स, सीईएससी, क्रॉम्प्टन, डेल्टा कॉर्प, इथोस, जीएमएम फॉडलर, ग्रीव्हज कॉटन, जुबिलंट फार्मोवा, प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थ, पर्ल ग्लोबल, शिपिंग कॉर्प, शिल्पा मेडिकेअर, बाजार स्टाईल रिटेल आणि व्हर्लपूल ऑफ इंडिया या काही आघाडीच्या कंपन्या आहेत ज्या आज त्यांचे तिसरे तिमाही निकाल जाहीर करतील.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: These shares will be beneficial today at 6 february 2026 as per experts advice stock market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: गिफ्ट निफ्टीचे नकारात्मक संकेत; व्यवहार करताना राहा सावध, ‘या’ शेअर्सवर ठेवा लक्ष
1

Share Market Today: गिफ्ट निफ्टीचे नकारात्मक संकेत; व्यवहार करताना राहा सावध, ‘या’ शेअर्सवर ठेवा लक्ष

Share Market News: शेअर बाजारातून चांगला परतावा हवा? डॉ. विकास व्ही गुप्ता म्हणतात की…
2

Share Market News: शेअर बाजारातून चांगला परतावा हवा? डॉ. विकास व्ही गुप्ता म्हणतात की…

Share Market Opening: RBI च्या निर्णयाने बदलला बाजारचा मूड, Sensex मध्ये 160 अंकांची उसळी
3

Share Market Opening: RBI च्या निर्णयाने बदलला बाजारचा मूड, Sensex मध्ये 160 अंकांची उसळी

Women Financial Planning: महिलांचे गुंतवणूक धोरण ठरतेय अधिक यशस्वी! बाजारातील अस्थिरतेतही ‘असा’ करतात सामना
4

Women Financial Planning: महिलांचे गुंतवणूक धोरण ठरतेय अधिक यशस्वी! बाजारातील अस्थिरतेतही ‘असा’ करतात सामना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.