(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
साखरेचा बाजारभाव ₹६५ प्रति किलो झाला आहे. असं असलं तरीही ही साखर ₹१३.५० मध्ये मिळू शकते. अनेक राज्यांमध्ये अंत्योदय अन्न योजनेच्या कुटुंबांसाठी साखरेचा एक निश्चित कोटा ठरवला जातो. पात्र कुटुंबांना सरकारने ठरवलेल्या अनुदानित दरात साखर पुरवली जाते. पण साखरेची किंमत राज्यानुसार बदलू शकते.
केंद्र आणि राज्य सरकारे सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये काही पात्र कुटुंबांना अनुदानित दरात साखर पुरवतात. हा लाभ विशेषतः अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना लागू होतो. जर तुमची शिधापत्रिका या श्रेणीत येत असेल, तर तुम्ही जवळच्या सरकारी शिधावाटप दुकानातून निश्चित दरात साखर खरेदी करू शकता.
शिधापत्रिकाधारक लोकांना सरकारी शिधावाटप दुकानांमधून बाजारभावापेक्षा कमी दरात साखर मिळू शकते. पण ही सुविधा प्रत्येक शिधापत्रिका धारकाला उपलब्ध नाही. साखरेसाठीची पात्रता तुमच्या शिधापत्रिकेच्या श्रेणीवर आणि राज्य सरकारच्या नियमांवर अवलंबून असते.
हे लक्षात घ्यायला हवं की, प्राधान्य कुटुंब किंवा बीपीएल शिधापत्रिकाधारकांना केंद्र सरकारकडून दरमहा साखर मिळण्याचा हक्क असेलच असं नाही. ही सुविधा राज्याच्या नियमांवर अवलंबून असते. काही राज्ये सणासुदीच्या काळात शिधापत्रिकाधारकांना साखरेवर सवलत किंवा विशेष पॅकेजेस देखील देतात. याचा अनेक राज्यांतील लोकांना संभाव्यतः फायदा होऊ शकतो. मात्र, हे लक्षात ठेवा की यासाठी पात्रता अनिवार्य आहे. त्यामुळे तुमच्या राज्यात वाटप ही सुविधा आहे का? असेल आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र आसाल तर नक्की या योजनेचा लाभ घ्या.






