(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
शेतकरी कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. या यादीतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आता 5 हजार कोटींचा पहिला हफ्ता वितरित करण्यात आला होता. याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 ऑगस्ट दिवशी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली होती. तसेच कर्जमाफी योजनेत दुसरा हफ्त लवकरच वितरित करण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली होती. त्यांनी सांगितल्या प्रमाणे 24 ऑगस्टला शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हफ्ता वितरीत करण्यात आला आहे.
दुसऱ्या टप्प्यात 6 लाख 20 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यात आली आहे. कर्जमाफीसाठीर सरकारने पावसाळी अधिवेशनात 20 हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी मागील आठवड्यात 6 लाख 20 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर एका आठवड्याभरात ही रक्कम वितरित करण्यास सरकारकडून मान्यता देण्यात आली.
सरकारने पहिल्या टप्प्यात 16 लाख 96 हजार पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. यापैकी 13 लाख 56 हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. तर बाकी 3 लाख 39 हजार शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण झालेलं नाही. यापूर्वी 7 हजार कोटी रुपयांपैकी शिल्लक रक्कम आणि सध्या मंजूर झालेले 4 हजार कोटी रुपये अशी रक्कम थेट बँक खात्यात हस्तांतरीत करण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरण झालेल्या शेतकऱ्यांना 4 हजार कोटी रुपयांचं वितरण करण्यात आली आहे.






