(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
साखरेच्या दरामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. हा सगळा राजकीय गोंधळ सुरु असताना विरोधी पक्ष सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. गंभीर आरोप केले जात आहे. सणासुदीच्या काळात साखरेच्या दरवाढीचा मुद्दा कडाडला आहे. इथेनॉलला या सगळ्यासाठी जबाबदार ठरवलं जात आहे. निर्मितीसाठी उसाचा वापर वाढल्यामुळे देशातील साखरेचा पुरवठा कमी होत आहे, ज्यामुळे दरात मोठी वाढ होत आहे. असा दावा विरोधी पक्ष करत आहेत. सरकार हे आरोप फेटाळून लावत देशात साखरेची कोणतीही कमतरता नाही आणि या दरवाढीत इथेनॉलचा काहीही संबंध नाही असं स्पष्ट केलं.
साखरेच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर, साखर उत्पादक कंपनी बलरामपूर शुगर मिल्सच्या शेअर्स सुसाट झाले आहेत. बलरामपूर चिनी मिल्स शेअर प्राईस ही केवळ पाच ट्रेडिंग दिवसांत जवळपास ११% ची वाढला आहे. सोमवारी, हा शेअर ₹७२८.९० वर होता. दुसरीकडे, उत्तम शुगर मिल्सचे शेअर्स सोमवारी उघडताच जवळपास १०% नी वाढले आणि तर काही वेळापूर्वी तो ₹३५०.७१ वर होते, ज्यात ८.४८% ची वाढ दिसून आली आहे. त्यामुळे बाजाराभावासोबत शेअर्समध्ये देखील सुसाट वाढ दिसून आली आहे.
साखर कंपन्यांच्या शेअर्सच्या यादीत धामपूर शुगर मिल्सचं नाव घ्यायलाच हवं. धामपूर शुगर मिल्सच्या शेअरच्या किमतीत अवघ्या पाच दिवसांत १२% वाढ झाली आहे. सोमवारी ट्रेडिंग सुरू होताच त्यात ६% पेक्षा जास्त वाढ होऊन तो ₹१९९.९२ झाला. हा आकड्यासह तो या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. गेल्या एका महिन्यात, या साखर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अंदाजे ३८% चा दमदार रिटर्न दिला आहे.
या यादीत पहिल्या नंबरचं स्थान मिळवलं आहे ते म्हणजे बजाज हिंदुस्तान शुगर लिमिटेडच्या शेअरने. या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी, सोमवारी, शेअर उघडताच जवळपास १२% नी वाढून गुंतवणूकदारांना तगडा नफा मिळवून दिला आहे. पाच ट्रेडिंग दिवसांत, शेअरने ४०% ची वाढ नोंदवत आहे.
या शेअर्स व्यतिरिक्त इतर शेअर्सही असे आहेत ज्यामध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. या मध्ये डालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीजच्या शेअरमध्येही जोरदार तेजी दिसून येत आहे. हा शेअर सोमवारी ५२० रुपयांवर पोहोचला आणि गेल्या पाच दिवसांत त्यात सुमारे १०% वाढ झाली आहे. श्री रेणुका शुगरच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाली असून, तो सुमारे ९% ने वाढून २७.६८ रुपयांवर पोहोचला आहे.
त्यामुळे बाजारातील साखरेचे भाव पाहता शेअर मार्केटमध्ये देखील साखरेचे शेअर्स असलेल्या कंपन्यांनी चांगलाच भाव खाल्ला आहे आणि तगडा नफा मिळवला आहे.
(टीप: शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या बाजार तज्ञाचा सल्ला घ्या.)






