Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्विस कंपन्या भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार; 10 लाख लोकांना मिळणार रोजगार!

भारतात स्विस कंपन्यांची गुंतवणूक वाढत असून, येत्या काही दिवसांत हा गुंतवणुकीचा आकडा 100 अब्ज डॉलर्सवर जाऊ शकतो. अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 28, 2024 | 02:55 PM
स्विस कंपन्या भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार; 10 लाख लोकांना मिळणार रोजगार!

स्विस कंपन्या भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार; 10 लाख लोकांना मिळणार रोजगार!

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदार आपले भांडवल काढून घेत आहेत. मात्र, असे असले तरी आता मोठी माहिती समोर आली आहे. भारतात स्विस कंपन्यांची गुंतवणूक वाढत असून, येत्या काही दिवसांत हा गुंतवणुकीचा आकडा 100 अब्ज डॉलर्सवर जाऊ शकतो.

विशेष म्हणजे यापूर्वी स्विस कंपन्यांचा कल चीनच्या अर्थव्यवस्थेकडे होता. मार्च महिन्यात युरोपियन मुक्त व्यापार संघटनेसोबत व्यापार आणि आर्थिक भागीदारी (टेप्टा) वर स्वाक्षरी करण्यात आली. युरोपियन मुक्त व्यापार संघटनेचा सर्वात मोठा सदस्य देश स्वित्झर्लंड आहे. हा करार मंजूर झाल्यावर स्विस गुंतवणुकीचा पूर भारतात येऊ शकतो.
(फोटो सौजन्य – istock)

हे देखील वाचा – 21 कोटी पगार, बोनस वेगळा… कोण आहे ही महिला जिने एचएसबीसी बॅंकेचा 160 वर्षांचा इतिहास बदलला

भारतीय बाजारपेठेवर कंपन्यांची नजर

प्रादेशिक व्यापार कराराच्या अंमलबजावणीनंतर अभियांत्रिकी कंपनी एबीबी आणि वाहतूक कंपनी कुहेने+नागेल सारख्या स्विस कंपन्या भारतात 100 अब्ज डॉलरपर्यंत गुंतवणूक करू शकतात. युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशनशी करार मंजूर झाल्यानंतर, स्विस गुंतवणुकीला चालना मिळेल. युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशनचे इतर सदस्य देश म्हणजे नॉर्वे, आइसलँड आणि लिकटेंस्टीन हे देश आहे. 140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशाच्या मोठ्या बाजारपेठेवर या देशांच्या कंपन्यांची नजर आहे. त्यांना या ठिकाणी माल विकण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

भारताच्या तुलनेत चीनच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा वेग मंदावला असल्याचे युरोपीयन व्यावसायिकांना वाटत आहे. या कंपन्यांना भारताच्या मजबूत आर्थिक विकासाचा मोठा फायदा मिळू शकतो. त्याचबरोबर यामुळे भारतातून औषधी, कपडे आणि यंत्रसामग्रीच्या निर्यातीला देखील चालना मिळण्यास मदत होणार आहे.

हे देखील वाचा – 45000 कोटींचा बिझनेस… मात्र, नेहमी मोबाईल सायलेंट ठेवतो हा बिझनेसमन, स्वत:च सांगितले कारण!

टेपामुळे (व्यापार आणि आर्थिक भागीदारी) 94.7 टक्के निर्यातीवरील शुल्क 22 टक्क्यांवरून शून्यावर आणले जाईल. ज्यामुळे ब्रिटन आणि युरोपियन युनियनच्या इतर देशांच्या कंपन्यांपेक्षा स्विस कंपन्यांना अधिक फायदा होईल. युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन आधारित कंपन्यांनी 15 वर्षांत 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केल्याने भारतात 10 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि त्या बदल्यात भारताने या कंपन्यांना गुंतवणुकीसाठी चांगले वातावरण निर्माण करण्याचे आश्वासन दिले आहे.

स्विस कंपन्यांच्या उत्पादनांची निर्यात खूपच कमी

सध्या भारतात स्विस कंपन्यांच्या उत्पादनांची निर्यात खूपच कमी आहे. 2023 मध्ये, स्विस कंपन्यांच्या एकूण यांत्रिक आणि इलेक्ट्रिकल निर्यातीपैकी केवळ 1.5 टक्के निर्यात भारताला झाली, तरीही तिचा हिस्सा 8 टक्क्यांनी वाढला आहे. कुहने नागेल कंपनी भारतात सतत विस्तारत आहे. 2019 मध्ये तिची कर्मचारी संख्या 2850 वरून 4800 पर्यंत वाढली आहे. ही कंपनी चेन्नई, गुरुग्राम, कोलकाता येथे आपली केंद्रे उघडत आहे. भारतातील कंपनीचे एमडी अनिश झा यांनी सांगितले आहे की, नॅशनल लॉजिस्टिक प्लॅन सारख्या सरकारी योजनांमुळे रस्ते, रेल्वे आणि बंदरांमध्ये गुंतवणूक वाढली आहे. ज्यामुळे मोठा फायदा होत आहे.

Web Title: Swiss companies to invest 100 billion dollars in india 10 lakh people will get employment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2024 | 02:49 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.