45000 कोटींचा बिझनेस... मात्र, नेहमी मोबाईल सायलेंट ठेवतो हा बिझनेसमन, स्वत:च सांगितले कारण!
झिरोधाचे संस्थापक आणि सीईओ नितीन कामथ यांनी कंपनीच्या नो-नोटिफिकेशन पॉलिसीचा खुलासा केला आहे. यामध्ये बोलताना त्यांनी आपला फोन सतत सायलेंट मोडवर का ठेवतो. ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी, अनावश्यक व्यस्तता टाळणे आवश्यक आहे. असेही त्यांनी म्हटले आहे. याशिवाय “प्रत्येकजण मोबाईल अनावश्यक जोडलेला असतो. यात प्रामुख्याने इंटरनेटवर अनेक गोष्टी अनावश्यक आणि अनावश्यक बनल्या आहेत. त्यात वेळ खर्ची पडतो. हीच बाब लक्षात घेऊन अनावश्यक कॉल्समुळे माझा स्वतःचा फोन शांत ठेवतो. असे त्यांनी सांगितले आहे.
हे देखील वाचा – ‘या’ आयपीओने वाढवली गुंतवणूकदारांची धाकधूक; तुम्ही तर गुंतवले नाहीत ना पैसे!
झिरोधाबाबत काय म्हटलंय वापरकर्त्याने…
४४ वर्षीय नितीन कामथ हे फोर्ब्सच्या यादीतील चौथे सर्वात तरुण भारतीय अब्जाधीश असून, त्यांची संपत्ती ४.८ अब्ज डॉलर आहे. तर त्यांचा भाऊ निखिल कामथ (३७) हा ३.१ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सर्वात तरुण भारतीय अब्जाधीश आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, “एकमात्र ब्रोकर जो तुम्हाला कोणत्याही प्रकारे व्यापार करण्यासाठी कधीही पुश करत नाही तो म्हणजे झिरोधा. झिरोधाकडून कोणतीही सूचना किंवा कोणताही ई-मेल पाठविला जात नाही. कंपनी ज्या वेगाने वाढत आहे, त्यात त्यांच्या या संकल्पनेचा मोठा वाटा आहे.
With everybody chasing “engagement,” we seem to have made many things on the internet annoying and unusable. My own phone is constantly on silent because of annoying calls, notifications, emails, etc.
From day one of @zerodhaonline, “don’t do unto others what you don’t want done… pic.twitter.com/KEqbvQvFXW
— Nithin Kamath (@Nithin0dha) October 25, 2024
काय म्हटलंय नितीन कामथ यांनी?
“आमचे पहिल्या दिवसापासूनचे तत्व हे आहे की, तुम्ही तुमच्यासोबत जे करू इच्छित नाही ते इतरांसोबत करू नका. आवश्यक असल्याशिवाय आम्ही कोणतेही ईमेल किंवा सूचना पाठवत नाही, म्हणूनच लोक आमचे वापरकर्ते म्हणून कायम राहतात. त्यांचा आमच्यावर विश्वास आहे. “वापरकर्त्यांना व्यापारासाठी न लावल्याने व्यवसायाला त्रास होतो. परंतु दीर्घकाळात ते ग्राहकांसाठी चांगले आहे. त्रासदायक अनावश्यक कॉल्स, नोटिफिकेशन्स आणि ईमेल्समुळे मी माझा फोन सायलन्स करतो.” असेही नितीन कामथ यांनी म्हटले आहे.