विजय थलपथीची संपत्तीचा आकडा किती (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
चित्रपटसृष्टीतून राजकारणात आलेले थलपथी विजयचे मूळ नाव जोसेफ विजय चंद्रशेखर आहे. विजय तामिळनाडूतील पेरांबूर आणि तिरुची पूर्व या मतदारसंघांमधून निवडणूक लढवून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करत आहे. विजयने आतपर्यंत जगभरात आपल्या अभिनयाने सर्वांचे मन जिंकून घेतले आहे. दरम्यान पेरांबूर जागेसाठी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. थलपथी विजयच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्याच्याकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे असे दिसून येत आहे.
त्याची एकूण संपत्ती किती आहे?
थलपथी विजयच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, थलपथी यांची एकूण संपत्ती ₹६२० कोटींहून अधिक आहे. यामध्ये जंगम मालमत्ता, सोने आणि इतर मालमत्तांचा समावेश आहे. त्याने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ₹१८४.५३ कोटींचे उत्पन्न जाहीर केले आहे, ज्यामध्ये कुटुंबातील सदस्यांना दिलेली कर्जे आणि ट्रस्टमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा समावेश आहे.
रिअल इस्टेटमधून मोठी कमाई
विजय थलपथी हा रिअल इस्टेटमधील GOAT (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) देखील आहेत, आणि तो यातून लक्षणीय उत्पन्न मिळवतो. त्यांचा GOAT (द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित झाला, जो प्रचंड यशस्वी ठरला. तो हिंदीमध्येही प्रदर्शित झाला होता. थलपथी विजय यांचा रिअल इस्टेट पोर्टफोलिओ खालीलप्रमाणे आहे:
थलपथी यांच्या मालमत्तेबद्दल प्रमुख माहिती
त्याच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, विजयवर कोणतेही कर्ज नाही. चित्रपटांव्यतिरिक्त, मालमत्तेवरील व्याज आणि भाडे हे त्याच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत. तो ब्रँड एंडोर्समेंटमधूनही कमाई करतो. विजय थलपथीने आता चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला असून तो पूर्णपणे राजकारणात सक्रिय आहे.






