
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 1 जानेवारीपासून कोणत्याही तारणशिवाय मिळणार 2 लाखांचे कृषी कर्ज
शेती उत्पन्नामध्ये असलेली अनिश्तितता, नैसर्गिक संकटे याशिवाय शेतमालाला न मिळणारा भाव यामुळे देशभरातील शेतकरी देशोधडीला लागले आहे. अनेक शेतकऱ्यांना तर शेतीमधून उत्पादन खर्चाइतकेही उत्पन्न मिळत नाही. परिणामी, शेतकऱ्यांसमोर शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडायचे कसे? असा प्रश्न आ वासून उभा असतो. ज्यामुळे त्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. मात्र, अशातच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतकरी कर्जमाफी देण्यास नकार देत, शेतकऱ्याला सरकारी कर्मचारी ठरवण्यात आले आहे.
शेतकऱ्याला ठरवले सरकारी कर्मचारी
तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली खरी शेतकऱ्यांना मोठे हेलपाटे मारावे लागत आहे. तेलंगणात कॉंग्रेस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी शेतकरी कर्जमाफी योजना चालवली जात आहे. ज्यामध्ये आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. मात्र, निजामाबाद येथे एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका शेतकरी कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी धावाधाव करणाऱ्या शेतकऱ्याला तेलंगणाच्या कृषी विभागाकडून सरकारी कर्मचारी ठरवण्यात आले आहे. या घटनेनंतर तेलंगणा सरकारवर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे.
(फोटो सौजन्य – istock)
काय आहे संपुर्ण प्रकरण
सरकारी विभागाच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्याचे नाव रोडा सुमन असून, त्यांच्यावर बॅंकेचे एकूण 1.92 इतके कर्ज आहे. हा आकडा पाहता तेलंगणा सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीच्या योजनेत संबंधित शेतकरी तंतोतंत बसतो. मात्र, या शेतकऱ्यास शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ दिला जात नाहीये. विशेष म्हणजे तेलंगणाच्या कृषी विभागाने याबाबत कारण देताना म्हटले आहे की, संबंधित शेतकऱ्याचे नाव हे सरकार दरबारी सरकारी कर्मचारी असे नोंदीत आहे. ज्यामुळे या शेतकऱ्याला सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळू शकत नाही. तेलंगणातील निजामाबादमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सरकारी नोकरी द्या… नाहीतर शेतकरी कर्जमाफी करा
दरम्यान, तेलंगणा सरकारकडून शेतकरी कर्जमाफी योजना राबवताना शेतकऱ्यांना हेलपाटे मारण्यास प्रवृत्त केले जात आहे. ज्यामुळे त्या ठिकाणी काही शेतकरी आंदोलन देखील करत आहे. तर शेतकरी रोडा सुमन यांना तेलंगणा सरकारने सरकारी कर्मचारी असल्याने, शेतकरी कर्जमाफी नाकारली आहे. त्यामुळे आता रोडा सुमन या शेतकऱ्याने तेलंगणा सरकारला तुमच्या म्हणण्याप्रमाणे एकतर सरकारी नोकरी द्या, अन्यथा शेतकरी कर्जमाफी करा, अशी मागणी केली आहे. या मुद्द्यावरून सध्या तेलंगणात चांगलेच वातावरण तापले आहे.