Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्र सरकार उभारणार 12 स्मार्ट औद्योगिक शहरे; महाराष्ट्रातील ‘या’ शहराचा समावेश!

देशातील उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलेले आहे. राजधानी दिल्लीला लागून असलेल्या नोएडा आणि ग्रेटर नोएडा सारखी देशभरात 12 स्मार्ट औद्योगिक शहरे स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यात महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराचा समावेश असणार आहे. त्यामुळे आता देशातील औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 26, 2024 | 07:31 PM
केंद्र सरकार उभारणार 12 स्मार्ट औद्योगिक शहरे; महाराष्ट्रातील 'या' शहराचा समावेश!

केंद्र सरकार उभारणार 12 स्मार्ट औद्योगिक शहरे; महाराष्ट्रातील 'या' शहराचा समावेश!

Follow Us
Close
Follow Us:

राजधानी दिल्ली लागून असलेली नोएडा आणि ग्रेटर नोएडा ही उत्तर प्रदेशातील मोठी औद्योगिक शहरे म्हणून उदयास आली आहेत. आता सरकार देशभरात ग्रेटर नोएडासारखी 12 स्मार्ट औद्योगिक शहरे स्थापन करण्याच्या तयारीत आहे. खरे तर, देशात स्वदेशी उत्पादनाला चालना देण्यासाठी, उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा आणि गुजरातमधील धोलेरा यासारख्या विविध राज्यांमध्ये ही 12 नवीन औद्योगिक शहरे स्थापन केली जाणार आहे.

महाराष्ट्रात ‘या’ शहराची उभारणी

उद्योग आणि अंतर्गत व्यापार (डीपीआयआयटी) विभागाचे सचिव राजेश कुमार सिंह यांनी शुक्रवारी (ता.२६) याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले आहे की, सध्याच्या घडीला अशी दोन औद्योगिक शहरे आंध्र प्रदेशात आणि एक बिहारमध्ये विकसित केली जात आहेत. गुजरातमधील धोलेरा, महाराष्ट्रातील ऑरिक (औरंगाबाद), मध्य प्रदेशातील विक्रम उद्योगपुरी आणि आंध्र प्रदेशातील कृष्णपट्टणम या शहरांच्या वसाहतींसाठी आधारभूत पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्या असून, आता उद्योगांसाठी भूखंड वाटपाचे काम सुरू आहे.
(फोटो सौजन्य : istock)

हेही वाचा : “नीती आयोग रद्द करा”; पीएम मोदींसोबतच्या बैठकीआधी ममता बॅनर्जींची मोठी मागणी!

औद्योगिक शहरांची संख्या 20 होणार

त्याचप्रमाणे, इतर चार औद्योगिक शहरांमध्ये देखील केंद्र सरकारचे एक विशेष युनिट वाहन रस्ते जोडणी, पाणी आणि वीज पुरवठा यासारख्या मूलभूत पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. ही आठ शहरे आधीच विकासाच्या टप्प्यात आहेत आणि अर्थसंकल्पात 12 नवीन औद्योगिक शहरांची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामुळे देशातील या शहरांची एकूण संख्या 20 झाली आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

नवीन शहरांसाठी डीपीआयआयटी केंद्रीय मंत्रिमंडळाशी संपर्क साधणार आहे. ‘यासाठी योजना तयार आहेत आणि जमीन राज्य सरकारांकडे आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या स्पेशल पर्पज व्हेइकल्सला आम्हाला केवळ इक्विटी मंजूरी द्यावी लागेल. असेही त्यांनी नमूद केले आहे.

औद्योगिक विकासाला चालना मिळणार

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात आणि रोजगार निर्मितीमध्ये उत्पादनाचा वाटा वाढविण्यात मदत होणार आहे. स्मार्ट औद्योगिक शहरांच्या स्थापनेच्या घोषणेवर बोलताना शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कंपनीचे भागीदार आशु गुप्ता म्हणाले आहे की, राज्ये आणि खासगी क्षेत्राच्या सहकार्याने या नाविन्यपूर्ण सुधारणामुळे औद्योगिक विकास आणि शहरी नियोजनाला मोठी चालना मिळू शकणार आहे.

Web Title: The central government set up 12 smart industrial cities aurangabad in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2024 | 07:31 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.