Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

2000 रुपयांच्या नोटा छपाईला किती खर्च आला होता? खुद्द अर्थमंत्र्यांनीच दिली संसदेत माहिती!

राज्यसभा खासदार संदीप कुमार पाठक यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना २००० रुपयांच्या नोटांची छपाई आणि त्या नष्ट करण्याबाबत आलेल्या खर्चासंदर्भात प्रश्न विचारला. केंद्र सरकारने 2000 रुपयांच्या किती नोटा छापल्या आणि या छापण्यासाठी आणि त्या चलनातून काढून घेण्यासाठी किती खर्च आला? याबाबत माहिती द्यावी. असा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यावर बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी खर्चाबाबत संसदेत माहिती दिली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 02, 2024 | 09:38 PM
2000 रुपयांच्या नोटा छपाईला किती खर्च आला होता? खुद्द अर्थमंत्र्यांनीच दिली संसदेत माहिती!

2000 रुपयांच्या नोटा छपाईला किती खर्च आला होता? खुद्द अर्थमंत्र्यांनीच दिली संसदेत माहिती!

Follow Us
Close
Follow Us:

8 नोव्हेंबर 2016 ही भारतात नोटाबंदीची सर्वात मोठी घोषणा झाली होती. अर्थात त्यानंतर देशात २००० आणि ५०० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आल्या होत्या. मात्र, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे 2023 रोजी अचानक 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली. 2000 च्या नोटा चलनात येऊन सात वर्षेही उलटली नाहीत. की त्या चलनात काढून घेण्यात आल्या. याच पार्श्वभूमीवर आज (ता.२) राज्यसभेत 2000 रुपयांच्या नोटा छापण्यासाठी आणि नष्ट करण्याच्या खर्चाबाबत सरकारला प्रश्न विचारण्यात आला.

12,877 कोटी रुपये झाले खर्च

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत याबाबत उत्तर देताना सांगितले की, जुलै 2016 ते जून 2017 आणि जुलै 2017 ते जून 2018 या कालावधीत सर्व मूल्यांच्या नोटांच्या छपाईसाठी 12,877 कोटी रुपये खर्च आला. मात्र, 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याच्या प्रक्रियेवर एकूण किती खर्च झाला याबाबत स्वतंत्रपणे गणना केलेली नाही.

राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला अर्थमंत्र्यांचे उत्तर

सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून, त्यात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान राज्यसभा खासदार संदीप कुमार पाठक यांनी अर्थमंत्र्यांना २००० रुपयांच्या नोटांची छपाई आणि त्या नष्ट करण्याबाबत आलेल्या खर्चासंदर्भात प्रश्न विचारला. केंद्र सरकारने 2000 रुपयांच्या किती नोटा छापल्या आणि या छापण्यासाठी आणि त्या चलनातून काढून घेण्यासाठी किती खर्च आला? याबाबत माहिती द्यावी. असा प्रश्न त्यांनी विचारला होता.

या प्रश्नावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीसंसदेत माहिती देताना सांगितले आहे की, “रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, नोटबंदीनंतर सर्व मूल्यांच्या नोटांच्या छपाईचा खर्च अनुक्रमे 7965 कोटी आणि 4912 कोटी रुपये इतका आला होता. म्हणजेच नोटाबंदीच्या चार महिने आधी आणि त्यानंतर २० महिने नोटांच्या छपाईवर १२८७७ कोटी रुपये खर्च झाले.”

दरम्यान, अर्थमंत्र्यांनी पुढे बोलताना सांगितले आहे की, 19 मे 2023 रोजी जेव्हा 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा करण्यात आली तेव्हा 3.56 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या, त्यापैकी 3.48 लाख कोटी रुपयांच्या नोटा 30 जूनपर्यंत बँकिंग प्रणालीत परत आल्या आहेत.

Web Title: The cost of printing rs 2000 notes finance minister gave the information in parliament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2024 | 09:38 PM

Topics:  

  • Nirmala Sitharaman

संबंधित बातम्या

8th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच DA आणि ३ महिन्यांची थकबाकी मिळणार
1

8th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच DA आणि ३ महिन्यांची थकबाकी मिळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.