Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विकायला काढली होती सरकारने ‘ही’ कंपनी; तिनेच मिळवून दिलाय सरकारला 2,413 कोटींचा लाभ!

Bharat Petroleum Corporation Limited : केंद्र सरकारने 2022 मध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) ही सरकारी कंपनी विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गेल्या जून महिन्यात सरकारने हा निर्णय स्थगित केल्याचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी जाहीरपणे सांगितले होते. अशातच आता याच सरकारी कंपनीने सरकारला तब्बल 2,413 कोटी रुपये लाभांश (डिव्हीडंट) मिळवून दिला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 03, 2024 | 05:22 PM
विकायला काढली होती सरकारने 'ही' कंपनी; तिनेच मिळवून दिलाय सरकारला 2,413 कोटींचा लाभ!

विकायला काढली होती सरकारने 'ही' कंपनी; तिनेच मिळवून दिलाय सरकारला 2,413 कोटींचा लाभ!

Follow Us
Close
Follow Us:

केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपासून सरकारी कंपन्यांमधील आपला हिस्सा घटवण्याचे धोरण अवलंबले होते. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) ही भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मालकीची कंपनी विक्री करण्याचा योजना बनवली होती. मात्र, सरकारने आता आपली ही योजना स्थगित केली आहे.

सरकारकडे एकूण 15,389.14 कोटींचा लाभांश जमा

अशातच आता बीपीसीएल या कंपनीने सरकारला सुमारे 2,413 कोटी रुपये इतका लाभांशाचा (डिव्हीडंट) हप्ता मिळवून दिला आहे. चालू आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये आतापर्यंत सरकारी कंपन्यांनी सरकारला 15,389.14 कोटी रुपये लाभांश म्हणून दिले आहेत. त्यात एकट्या बीपीसीएलने सरकारला सुमारे 2,413 कोटी रुपये मिळवून दिले आहे. त्यामुळे आता एकवेळ विक्रीला काढलेल्या कंपनीने सरकारला इतक्या मोठ्या प्रमाणात लाभांश मिळवून दिल्याने, सरकारला चांगलीच चपराक लागली आहे.

हे देखील वाचा – भारतीय म्हणून कार कंपनीने अपमान केला; तब्बल 10 कार खरेदी करत, …या राजाने कंपनीला शिकवला धडा!

देशातील दुसरी सर्वात मोठी तेल विपणन कंपनी

इंडियन ऑइलनंतर बीपीसीएल ही देशातील दुसरी सर्वात मोठी तेल विपणन कंपनी आहे. कंपनीचे मुंबई, कोची आणि मध्य प्रदेश या ठिकाणी रिफायनरी आहेत. दरम्यान, केंद्र सरकारच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर याबाबत म्हटले आहे की, सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपनी बीपीसीएलकडून सरकारला सुमारे 2,413 कोटी रुपये लाभांशाचा हप्ता म्हणून मिळाला आहे.

हे देखील वाचा – ‘या’ छोट्या कंपनीच्या आयपीओवर तुटून पडले गुंतवणूकदार; जीएमपी देतोय चांगल्या परताव्याचे संकेत!

या आहेत सरकारला लाभांश मिळवून देणाऱ्या कंपन्या

चालू आर्थिक वर्षात 2024-25 मध्ये आतापर्यंत केंद्र सरकारला सरकारी कंपन्यांकडून लाभांशाच्या स्वरुपात 15,389.14 कोटी रुपये मिळाले आहेत. यामध्ये इंडियन ऑईल कोर्पोरेशनकडून (आयओसी) 5,091 कोटी रुपये, इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून 40 कोटी रुपये, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडून 554 कोटी रुपये आणि टेलिकॉम कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड या कंपनीकडून 3,443 कोटी रुपये लाभांश मिळाला आहे. अशातच आता विक्रीस काढलेल्या बीपीसीएलने देखील सरकारी तिजोरीत 2,413 कोटी रुपये जमा केले आहेत.

Web Title: The government was about to sell bpcl but the same company deposited rs 2413 crore in the government account

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 02:53 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.