आणखी एक कोरियन कंपनी तगडा आयपीओ आणण्याच्या तयारीत; ह्युंदाईचा विक्रम मोडणार का?
भारतीय शेअर बाजारात सध्या ऐतिहासिक उसळी पाहायला मिळत आहे. याच उसळीचा फायदा घेत काही छोट्या कंपन्यांनी आपले आयपीओ बाजारात खुले केले आहे. अशातच आता एका छोट्या कंपनीच्या आयपीओवर गुंतवणुकदार तुटून पडल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या महिन्यातील हा पहिलाच आयपीओ आहे. कंपनीने या आयपीओच्या माध्यमातून 167.93 कोटी रुपये उभारण्याची योजना बनवली आहे. कंपनीने आपल्या या आयपीओची दर्शनी किंमत १० रुपये प्रति शेअर इतकी ठेवली आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील एखाद्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल ही तुमच्यासाठी मोठी संधी असणार आहे.
काय आहे या कंपनीचे नाव?
प्रिसिजन कंपोनेंट्स इंजिनिअरिंग असे या कंपनीचे नाव असून, ती प्रिसिजन कंपोनेंट्स मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी आहे. या कंपनीचा आयपीओ 2 सप्टेंबर रोजी खुला झाला आहे. या आयपीओसाठी कंपनीने शेअर्सची किंमत 503 रुपये ते 529 रुपये प्रति शेअर इतकी निश्चित केली आहे. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून एकूण 167.93 कोटी रुपये उभारणार आहे. यामध्ये 135.34 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स आणि 32.59 कोटी रुपयांचे शेअर्स हे ऑफर फॉर सेल (ओएफएस) अंतर्गत जारी करण्यात आले आहेत.
या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना कमीत कमी 28 शेअर्समध्ये पैसे गुंतवता येणार आहे. तर कमाल 13 शेअर्सवर म्हणजेच एकूण 364 शेअर्सवर जास्तीत जास्त बोली लावली जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही या आयपीओमध्ये 14,812 रुपयांपासून 1,92,556 रुपयांपर्यंत बोली लावू शकतात.
या आयपीओबाबत महत्वाच्या तारखा
– IPO उघडण्याची तारीख – सोमवार, 2 सप्टेंबर 2024
– IPO बंद होण्याची तारीख – बुधवार, 4 सप्टेंबर 2024
– शेअर्स वाटपाची तारीख – गुरुवार, 5 सप्टेंबर 2024
– परतावा मिळण्याची तारीख – शुक्रवार, 6 सप्टेंबर, 2024
– डीमॅट खात्यात शेअर्स जमा करण्याची तारीख – शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024
– शेअरच्या लिस्टिंगची डेट – सोमवार, 9 सप्टेंबर, 2024
आयपीओला गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद
प्रिसिजन कंपोनेंट्स इंजिनिअरिंगच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच दिवशी आयपीओ खुला झाल्यानंतर काही तासांतच आयपीओद्वारे मोठी कमाई झाली आहे. पात्र संस्थागत खरेदीदारांनी त्यांचा कोटा 0.94 पट, गैर-संस्थात्मक खरेदीदारांनी 6.84 पट, किरकोळ गुंतवणूकदारांनी 6.10 पट आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शेअर्समध्ये 20.39 पट सदस्यता घेतली आहे. विशेष हा आयपीओ पहिल्याच दिवशी दुपारी 1.30 पर्यंत 4.68 वेळा सबस्क्राइब झाला आहे.
जीएमपी देतोय चांगल्या परताव्याचे संकेत
हा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये चांगल्या कमाईचे संकेत देत आहे. आयपीओ 268 रुपयांवर म्हणजेच 50.66 टक्के प्रीमियमवर ट्रेंड करत आहे. अशीच स्थिती लिस्टिंगच्या दिवसापर्यंत कायम राहिली तर कंपनीचे शेअर्स 797 रुपयांवर सूचीबद्ध होऊ शकतात. अशा स्थितीत गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी चांगले उत्पन्न मिळण्यास मदत होऊ शकते.