'ही' आहे देशातील दुसरी सर्वात श्रीमंत महिला; वाचा... काय आहे तिचे रतन टाटांसोबतचे कनेक्शन?
भारतातील दुसरी सर्वात श्रीमंत महिला म्हणून रोहिका मिस्त्री ओळखल्या जातात. फोर्ब्सच्या वार्षिक श्रीमंतांच्या यादीनुसार, त्यांची एकूण किंमत ७७,००० कोटी रुपये इतकी आहे. त्या प्रसिद्ध व्यावसायिक साइरस मिस्त्री यांच्या पत्नी आहेत. साइरस मिस्त्री यांच्या मृत्यूनंतर रोहिका यांना ही मालमत्ता आणि व्यवसाय वारसाने मिळाली आहे. रोहिका यांच्याकडे टाटा समूहाचा 18.4 टक्के हिस्सा आहे. सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे अध्यक्ष राहिले आहेत. सायरस मिस्त्री यांचा २०२२ मध्ये कार अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांना ही मालमत्ता मिळाली आहे.
टाटा समूहातील 18.4 टक्के हिस्सा कायम
सायरस मिस्त्री हे 2012 ते 2016 पर्यंत टाटा समूहाचे अध्यक्ष होते. 2016 मध्ये त्यांना या पदावरून हटवण्यात आले होते. यानंतर रतन टाटा आणि मिस्त्री कुटुंबातील संबंधात तणाव निर्माण झाला होता. तथापि, सायरस मिस्त्री यांनी समूहातील त्यांचा 18.4 टक्के हिस्सा कायम ठेवला होता. आता त्यांची पत्नी रोहिका यांना तो मिळाला आहे. रोहिका मिस्त्री यांचा जन्म एका संपन्न कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा एम करीम छागला हे सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ आणि राजकारणी होते. रोहिकाचे वडील इक्बाल छागला हे ज्येष्ठ वकील आहेत. रोहिकाने सायरस मिस्त्री यांच्याशी १९९२ मध्ये लग्न केले.
हे देखील वाचा – केवळ 2,500 रुपये भांडवलात सुरु केला व्यवसाय; आज कमावतीये वर्षाला 1 कोटी रुपये!
रतन टाटा-सायरस मिस्त्री यांच्यात वाद
रोहिका मिस्त्रीशिवाय आणखी दोन भारतीय महिलांनी फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवले आहे. सरोज राणी गुप्ता आणि रेखा झुनझुनवाला या आहेत. फोर्ब्सची वार्षिक श्रीमंतांची यादी ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी आहे. ही यादी दरवर्षी मार्चमध्ये प्रसिद्ध केली जाते. टाटा समूह हा भारतातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठित समूह आहे. या समूहाने अनेक दशकांपासून भारतीय उद्योगात मोठी भूमिका बजावली आहे. मात्र, या समुहाच्या इतिहासात एक वेळ अशी आली. जेव्हा या समुहातच मोठा वाद निर्माण झाला होता. हा वाद रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यात झाला होता.
काय होते वादाचे मुख्य कारण
रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यातील वादाचे मुख्य कारण म्हणजे टाटा समूहाच्या भविष्याबाबतची वेगळी दृष्टी आहे. समूहाने पारंपारिक मूल्यांसह पुढे जावे, असे रतन टाटा यांचे मत होते. त्याचवेळी टाटा समूहाने आधुनिक काळातील आव्हानांना तोंड देण्यासाठी नवीन बदल करावेत, अशी सायरस मिस्त्री यांची इच्छा होती. सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. या घटनेने भारतीय उद्योगसमूहात खळबळ उडाली होती.