'हे' आहेत भारतातील सर्वाधिक खर्च झालेले विवाहसोहळे; वाचा... विराट-अनुष्काच्या लग्नाचा खर्च!
नुकताच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा पार पडला. या लग्नात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चामुळे हा विवाह चांगलाच चर्चेत राहिला. या विवाहासाठी अंबानी कुटुंबाकडून जवळपास ५ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, आता भारतात असे अनेक जोडप्यांचे विवाह आहेत. ज्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. आज आपण देशात सर्वाधिक खर्च करण्यात आलेल्या जोडप्यांच्या विवाहाबद्दल जाणून घेणार आहोत…
इशा अंबानी-आनंद पिरामल यांच्या लग्नात ७०० कोटी खर्च
१२ डिसेंबर २०१८ रोजी मुकेश आणि नीता अंबानी यांची एकुलती एक कन्या इशाचा आनंद पिरामल यांच्यासोबत झालेला विवाहसोहळा लक्षवेधी ठरला होता. इशाने लग्नात ९० कोटी रुपयांचा लेहंगा घातला होता. या सोहळ्यावर ७०० कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आहे. याशिवाय २००४ मध्ये दिवंगत उद्योगपती सुब्रतो रॉय यांचा मुलगा सुशांतोचे रिचासोबत, तर सुमांतोचे चांतणीसोबत लग्न झाले, ११ हजार पाहुण्यांनी या सोहळ्याला लावली होती.
हेही ठरले शाही विवाहसोहळे
याशिवाय २०१३ मध्ये प्रमोद मित्तल यांची कन्या सृष्टीचा विवाह इन्व्हेस्टमेंट बँकर गुलराज बहल यांच्यासोबत झाला. स्पेनमध्ये तीन दिवस पार पडलेल्या या विवाहावर ५०० कोटी रुपये खर्च झाले. २०१५ मध्ये संजय हिंदुजा यांनी त्यांची गर्लफ्रेंड अनु महतानीसोबत विवाह केला. उदयपूर येथे पार पडलेल्या या शाही विवाह सोहळ्यावर एकूण १५० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
किती केला विराट-अनुष्काने लग्न खर्च?
२०१६ मध्ये राजकीय नेते गली जनार्दन रेडी यांची मुलगी ब्राह्मणीचा विवाह राजीव रेड्डी यांच्यासोबत झाला. या विवाह सोहळ्यावर ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. २०१७ मध्ये ऑस्ट्रिया येथे स्टॅलियन ग्रुप फाउंडर सुनील वासवानी यांची मुलगी सोनमचा नवीन फाबियानी यांच्यासोबत विवाह झाला. यावर २१० कोटी रुपये खर्च केला गेला. २०१७ मध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी इटलीमध्ये विवाहबद्ध झाले. विरुष्का म्हणून लोकप्रिय असलेल्या जोडीच्या लग्नावर १०० कोटी रुपयांचा खर्च झाला होता.