युपीआयची व्यवहार मर्यादा वाढली; ...आता करता येणार इतक्या रुपयांपर्यंत ग्राहकांना पेमेंट!
देशभरातील बॅंकांची शिखर संस्था असलेल्या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) देशभरातील सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. सणासुदीचा काळ सुरु झाला असून, या काळात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पेमेंट वाढणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन, आरबीआयने मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने युपीआयची व्यवहार मर्यादा वाढवली आहे. याद्वारे छोटे व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना सर्वाधिक फायदा होणार आहे.
याशिवाय युपीआय लाईट आणि युपीआय 123 पे बाबतही एक चांगली बातमी देण्यात आली आहे. त्यामुळे आता युपीआयबाबत तीन मोठे बदल करण्यात आले आहेत. ज्याचा थेट फायदा हा सर्वसामान्य लोकांना आणि लहान व्यवहार करणाऱ्यांना होणार आहे.
हे आहेत आरबीआयने घेतलेले तीन निर्णय
1. UPI 123pay ची मर्यादा 5000 रुपयांवरून 10,000 रुपये करण्यात आली आहे.
2. UPI Lite ची वॉलेट मर्यादा देखील 2000 रुपयांवरून 5000 रुपये करण्यात आली आहे. याद्वारे सामान्य लोकांना मोठा फायदा होणार आहे. कारण ते लहान व्यवहारांसाठी UPI Lite मोठ्या प्रमाणावर वापरतात.
3. UPI Lite ची प्रति व्यवहार मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे. ती प्रति व्यवहार 500 रुपयांवरून 1000 रुपये इतकी करण्यात आली आहे.
हे देखील वाचा – आरबीआयकडून कर्जदारांना मोठी भेट; …आता लोन बंद करण्यासाठी नाही द्यावे लागणार शुल्क!
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी युपीआयच्या महत्वाबाबत सांगितले आहे की, युपीआय व्यवहारांद्वारे भारताच्या आर्थिक परिदृश्यात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे देशात पैशाचे व्यवहार अतिशय सुलभ आणि सहज सोपे झाले आहेत. दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आपल्या पतधोरणात सलग दहाव्यांदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. तो 6.5 टक्के कायम ठेवला आहे. रेपो दर तोच राहिल्यास गृहकर्ज, वाहन कर्जासह विविध कर्जावरील तुमच्या ईएमआयमध्ये बदल होणार नाही.
जागतिक परिस्थितीमुळे सावध पवित्रा
देशातील वित्तीय क्षेत्र निरोगी, लवचिक आणि स्थिर आहे. भारतीय चलन रुपया मर्यादेत आहे. सध्याच्या आर्थिक आव्हानांमुळे आणि जागतिक परिस्थितीमुळे, आरबीआयने सावध दृष्टीकोन स्वीकारला आहे. देशातील रोख व्यवस्थापन चपळ आणि लवचिक राहील. भारतीय बँकांचे आरोग्य भक्कम आहे. तर ग्राहक कर्ज आणि क्रेडिट कार्डच्या वाढत्या थकबाकीबाबत सावध राहण्याची गरज आहे, असेही शक्तीकांत दास शेवटी म्हणाले आहे.