Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हिसाचे पेमेंट्ससाठी मार्गदर्शन: सुरक्षितपणे टॅप अँड पे करा

टॅप टू पे पद्धत कॉन्टॅक्टलेस कार्ड, स्मार्टफोन, वीअरेबल्स आणि मोबाईल अॅप्सद्वारे जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर व्यवहारांची सुविधा देते. यामध्ये बायोमेट्रिक सुरक्षा व एन्क्रिप्शनमुळे आर्थिक माहिती सुरक्षित राहते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 07, 2025 | 04:39 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या डिजिटल युगात खरेदी व व्यवहार अधिक सुलभ व सुरक्षित झाले आहेत. तुम्हाला झटपट कॉफी घ्यायची असेल किंवा महागडी खरेदी करायची असेल, टॅप-टू-पे पद्धतीमुळे तुमचे अनुभव जलद व सोयीस्कर होतात. व्हिसाने कॉन्टॅक्टलेस पेमेंट्ससाठी मार्गदर्शन केले आहे, जे तुम्हाला कुठेही, कधीही सुरक्षित व्यवहारांची खात्री देते.

Share Market Crash: HMPV ची दहशत, शेअर बाजार झाला क्रॅश; 800000 कोटींचे नुकसान

टॅप टू पे कसे कार्य करते?

टॅप टू पे ही डिजिटल पेमेंट्सची एक अत्याधुनिक व सुलभ पद्धत आहे, जी व्यवहारांना अधिक वेगवान व सुरक्षित बनवते. ही पद्धत अनेक प्रकारांमध्ये वापरता येते, जसे की कॉन्टॅक्टलेस कार्ड, स्मार्टफोन, वीअरेबल्स आणि मोबाईल अॅप्स.

1. कॉन्टॅक्टलेस कार्डद्वारे पेमेंट्स

ईएमव्हीसीओ® चिप-आधारित कॉन्टॅक्टलेस कार्ड (वाय-फाय चिन्ह असलेले) ही टॅप टू पे तंत्रज्ञानातील सर्वात लोकप्रिय सुविधा आहे. या कार्डांचा वापर करताना ग्राहकाला फक्त मर्चंटच्या पेमेंट टर्मिनलवर आपले कार्ड हलकेच टॅप करावे लागते. काही सेकंदांतच व्यवहार पूर्ण होतो, ज्यामुळे वेळेची बचत होते आणि रांगेत उभे राहण्याचा त्रास कमी होतो. ही कार्डे आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुतेक व्यापाऱ्यांकडून स्वीकारली जातात. त्यामुळे प्रवासातही ग्राहकाला व्यवहार करताना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागत नाही.

2. स्मार्टफोनद्वारे कॉन्टॅक्टलेस पेमेंट्स

आधुनिक स्मार्टफोनमधील बँकिंग व पेमेंट अॅप्स ग्राहकाला त्यांच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती सहजपणे जोडण्याची (लोड करण्याची) सुविधा देतात. मर्चंट टर्मिनलवर स्मार्टफोन टॅप केल्यावर व्यवहार पूर्ण होतो. या पद्धतीमुळे ग्राहकांना प्रत्यक्ष कार्ड किंवा रोख रक्कम नेण्याची गरज उरत नाही. शिवाय, बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन व एन्क्रिप्शन यासारख्या अत्याधुनिक सुरक्षा उपायांमुळे आर्थिक माहिती सुरक्षित राहते.

3. वीअरेबल्सद्वारे हँड्स-फ्री पेमेंट्स

स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकर्ससारख्या वीअरेबल डिव्हाइसच्या माध्यमातून टॅप टू पे ही पद्धत अधिक सुलभ झाली आहे. या उपकरणांमध्ये ग्राहकाचे कार्ड डिटेल्स सुरक्षितरीत्या साठवले जातात. त्यामुळे ग्राहक चालता-फिरता, कोणत्याही उपकरणाचा वापर न करता, हँड्स-फ्री पेमेंट करू शकतात. यामुळे खरेदीचा अनुभव अधिक आरामदायी व जलद होतो.

अडानीला मिळणार रू. 1,71,39,85,00,000 रकमेचा चेक, कुठे करणार खर्च; यादीही तयार

4. मोबाईल ऍप्सद्वारे व्यवहारांवर नियंत्रण

टॅप टू पे पद्धतीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे मोबाईल बँकिंग अॅप्सद्वारे व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता. ग्राहकांना त्यांच्या कॉन्टॅक्टलेस कार्ड किंवा क्रेडेन्शियल्स ऑनलाइन व ऑफलाइन कसे व कुठे वापरावे याबाबत मर्यादा सेट करण्याचा पर्याय मिळतो. यामुळे फसवणुकीचा धोका कमी होतो आणि ग्राहकांना त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर अधिक नियंत्रण मिळते. टॅप टू पेच्या या विविध प्रकारांमुळे व्यवहार जलद, सुरक्षित व सोयीस्कर होतात, जे डिजिटल व्यवहारांमध्ये क्रांती घडवत आहेत.

सुरक्षितता आणि प्राधान्य का?

टॅप-टू-पे पद्धतीमुळे व्यवहार जलद, सुरक्षित व सोयीस्कर होतात. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन, एन्क्रिप्शन, आणि डिजिटल कार्ड स्टोअरेजमुळे आर्थिक माहितीचा कोणताही अपव्यय होण्याचा धोका कमी होतो. एकंदरीत, हा पर्याय फार सोयीस्कर आणि विश्वासार्थ आहे. कुठेही, कधीही सुरक्षित व जलद व्यवहारांसाठी टॅप अँड पेचा पर्याय निवडा. डिजिटल पेमेंट्सच्या या पद्धतीमुळे खरेदीचा अनुभव अधिक सुखद आणि सुरक्षित होतो.

Web Title: Visa payments guide tap and pay securely

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 04:39 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.