Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Year Ender 2024: यंदाच्या वर्षी सोन्याला मिळाले चमकदार भाव, 2025 पर्यंत राहील का चमक?

2024 मध्ये सोन्याचे भावाने नवा उच्चांक गाठताना आपण सर्वांनीच पाहिले. पण येणाऱ्या नवीन वर्षात सुद्धा सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे का? चला जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 22, 2024 | 10:17 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

यंदाचे वर्ष हे खऱ्या अर्थाने सोनेरी होते यात काही वाद नाही. याचे कारण म्हणजे सोन्याच्या दरांनी गाठलेला उच्चांकी भाव. ज्यांनी कोणी कोव्हीड किंवा २ वर्षाआधी सोन्यात गुंतवणूक केली असेल त्यांना नक्कीच या वर्षी सोन्याने सोनेरी परतावा दिला असेल.

खरंतर भारतात नेहमीपासूनच सोन्याला गुंतवणुकीपेक्षा भावनिक महत्व जास्त आहे. पण हळहळू काही लोकं सोन्यात गुंतवणूक करू पाहत आहे. याचे कारण म्हणजे ऑक्टोबर 2024 पर्यंत, सोन्याच्या किंमतीत 35 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसले आहे, जी 40 वर्षांतील म्हणजे तब्बल 4 दशकांतील सर्वोत्तम कामगिरी आहे. यानंतर नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सोन्याच्या व्यापारात ५ टक्क्यांची घसरण दिसून आली, असे असतानाही सोन्याच्या दरात वार्षिक २८ टक्के वाढ झाली, म्हणजेच त्याचा परतावा २८ टक्क्यांहून अधिक झाला आहे. आता येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजेच 2025 मध्ये सोन्याची कामगिरी कशी असेल याबाबत जाणून घेऊया.

GST On Popcorn : आता खाद्य पदार्थांवर चवीनुसार द्यावा लागणार GST; जीएसीटी परिषदेत नेमकं काय काय ठरलं? वाचा सविस्तर

अमेरिकेवरून आलेल्या संकेताचा होईल परिणाम

यावेळच्या फेडरल रिझर्व्हमधील बैठकीच्या निर्णयानुसार, यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.25 टक्क्यांनी कपात केली आहे आणि 2025 साठी देखील व्याजदर कपातीची प्रक्रिया सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर डॉलरच्या दरात वाढ होण्याचा ट्रेंड कायम असून त्याचा विपरीत परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे. सन 2025 मध्ये मंद आर्थिक धोरणाची शक्यता आहे आणि त्या आधारावर सोन्याच्या किंमतीतही चढ-उतार दिसून येत आहेत, त्यामुळे सोने 2600 डॉलर प्रति औंस (ounce) पर्यंत घसरले होते.

सोन्याची टेक्निकल लेव्हल काय सांगते?

सोन्याची टेक्निकल लेव्हल पाहिल्यास, बाजार प्रति औंस $2634 पर्यंत वाढण्याबद्दल आशावादी होते. जर सोने प्रति औंस $2674 च्या वर गेले तर त्याची किंमत $2725, 2780 आणि $2840 प्रति औंस पर्यंत दिसू शकते. मात्र, जागतिक अनिश्चिततेमुळे सोन्याचे दर घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विद्यार्थ्याने बनवला मानवाला घेऊन उडणारा ड्रोन, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी कौतूक करत शेअर केली पोस्ट

भारतात सोन्याची कामगिरी कशी राहील?

सोन्यामध्ये सध्यातरी घसरण पाहायला मिळते आणि त्यामागील कारण म्हणजे डॉलरची मजबूती. 2024 सारखा सोन्याचा परतावा 2025 मध्ये दिसणार नाही, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करताना दिसत आहे.

केंद्रीय बँकांकडून सोन्याची खरेदी सुरूच

जगातील अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका सध्या सोने खरेदी करण्यावर आणि त्यांच्याकडील सोन्याचा साठा वाढवण्यावर भर देत आहेत. सोन्याचा साठा मजबूत करून जियो-पॉलिटिकल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ही एक चांगली रणनीती असू शकते, म्हणूनच, जर्मनी, फ्रान्स, चीन आणि भारताच्या मध्यवर्ती बँका देखील त्यांच्या सोन्याच्या साठ्यात झपाट्याने वाढ करत आहेत.

Web Title: What will the price of gold in 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2024 | 10:17 PM

Topics:  

  • Gold Rate
  • Year Ender 2024

संबंधित बातम्या

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या भावात पुन्हा झाली घसरण, चांदीचे दर वधारले! एका क्लिकवर जाणून घ्या आजच्या किंमती
1

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या भावात पुन्हा झाली घसरण, चांदीचे दर वधारले! एका क्लिकवर जाणून घ्या आजच्या किंमती

Dussehra: विजयादशमीच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी…; सराफ बाजारात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी
2

Dussehra: विजयादशमीच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी…; सराफ बाजारात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी

Todays Gold-Silver Price: सोनं – चांदीच्या वाढत्या किंमतींना लागला ब्रेक, किंचीत घसरले भाव! जाणून घ्या सविस्तर
3

Todays Gold-Silver Price: सोनं – चांदीच्या वाढत्या किंमतींना लागला ब्रेक, किंचीत घसरले भाव! जाणून घ्या सविस्तर

Gold Price Prediction: सोन्याच्या दरात होणार का बदल? दसरा तोंडावर असताना आरबीआयची बैठक काय संकेत देणार?
4

Gold Price Prediction: सोन्याच्या दरात होणार का बदल? दसरा तोंडावर असताना आरबीआयची बैठक काय संकेत देणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.