3000 रुपये भांडवलात, बेरोजगार तरुण बनला करोडपती व्यावसायिक; वाचा... त्याची यशोगाथा!
देशातील अनेक तरुण सध्या शेतीकडे वळत आहेत. यातील अनेक तरुण शेतीआधारित उद्योगधंद्यांमध्ये आपले नशीब आजमावत आहेत. विशेष म्हणजे या तरुणांना आपल्या ज्ञान आणि शिक्षणाच्या जोरावर शेतीआधारित उद्योगांमध्ये मोठे यश देखील मिळत आहे. आज आपण अशाच तरुण शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्याने आपल्या शेतीला जोडून केवळ तीन हजार रुपये गुंतवणूकीतून व्यवसायाला सुरुवात केली. मात्र, आज तो आपल्या व्यवसायातून वर्षाला कोट्यवधी रुपये कमावत आहे.
नोकरीच्या मागे न लागता धरली व्यवसायाची वाट
तरुण उद्योजक भावेश चौधरी असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, तो हरियाणातील रहिवासी आहेत. उच्च शिक्षण घेतल्यानंतर भावेश याने सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केले. मात्र, वाढलेली स्पर्धा पाहता, त्यात त्याला यश आले नाही. त्यामुळे त्याने काहीतरी उद्योगधंद्यात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, त्याने ‘कसुतम बिलोना घी’ नावाचा व्यवसाय सुरू केला आहे. पारंपारिक पद्धतीचा वापर करून बनवलेले A2 तूप विकून त्यांनी करोडोंचा यशस्वी व्यवसाय उभा केला आहे. लोकांना शुद्ध आणि आरोग्यदायी तूप उपलब्ध करून देणे हा भावेशचा हा व्यवसाय सुरु करण्यामागील उद्देश आहे.
हेही वाचा – मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय… या शेतकऱ्यांना होणार फायदा; वाचा… सविस्तर
केवळ तीन हजारांच्या गुंतवणुकीतून उभारला व्यवसाय
विशेष म्हणजे भावेश याने केवळ तीन हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून आपल्या या व्यवसायाला सुरुवात केली. मात्र, आज त्याच्या याच छोट्याशा व्यवसायाचा आज कोट्यवधींचा व्यवसायात रुपात झाले आहे. भावेश यांच्या कुटुंबातील बहुतांश लोक लष्करात आहेत. त्यामुळे त्यांना सैन्यात भरती होण्यासही सांगण्यात आले. अभ्यास सोडून पैसे उधळण्याचे टोमणेही त्याला ऐकावे लागले. पण, भावेशला नेहमीच काहीतरी वेगळे करायचे होते. त्याने बीएससीला प्रवेश घेतला, पण त्याला शिक्षण अर्धवट सोडावा लागले. कारण त्यांनी व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला होता.
व्यवसायाची नव्हती जाण
अशातच भावेश यांना शुद्ध देशी तुपाच्या व्यवसायाची कल्पना सुचली. मात्र, पॅकेजिंगचे ज्ञान आणि मार्केटिंगचे ज्ञान नसल्याने त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला पैसे देखील नव्हते. मात्र, यूट्यूबची मदत घेत त्याने आईचे गावातील शुद्ध तूप बनवतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर तो इतरांच्या पोस्टवर जाऊन आपला नंबर द्यायाचा. इथे तुम्हाला शुद्ध तूप मिळेल. अशा आशयाने तो मार्केटिंग करू लागला. त्यातूनच हळूहळू त्याच्या शुद्ध देशी तुपाची मागणी वाढू लागली. आज तो शुद्ध देशी तुपाचा करोडोंचा व्यवसाय करत आहे.
किती होतीये कमाई
भावेश हा बिलोना पद्धतीने A2 गायीच्या दुधापासून तूप बनवण्यास सुरुवात केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला अवघ्या आठवडाभरात पहिली ऑर्डर मिळाली. या ऑर्डरमधून त्याला 1,125 रुपये मिळाले. ही त्यांच्या यशस्वी प्रवासाची सुरुवात होती. मात्र, आज भावेशने आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने 15,000 हून अधिक ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. आज त्याच्या तुपाला देशभरात मागणी आहे. त्यांना दर महिन्याला 70 लाख रुपये उत्पन्न मिळत आहेत. आज भावेश व्यवसाय तब्बल आठ कोटींपर्यंत पोहोचला आहे. त्याला वर्षाला तब्बल १ कोटींची कमाई होत आहे.