२०४७ पर्यंत भारत 'विकसित राष्ट्र' होणार का? जागतिक बँक म्हणतीये अजून लागणार 'इतके' वर्ष!
केंद्र सरकारकडून विकसित भारताचे स्वप्न २०४७ पर्यंत पूर्ण करण्याची वलग्ना केली जात आहे. त्यासाठी सरकारकडून कसोशीने प्रयत्न केले जात असल्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक व्यासपीठांवरून वारंवार सांगत असतात. मात्र, आता जागतिक बँकेने भारताचे विकसित राष्ट्र होण्याचे स्वप्न करण्यासाठी भारताला आणखी ७५ वर्ष तरी लागतील, असे जागतिक बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे चीन आणि इंडोशिया या देशांच्या तुलनेत हा कालावधी अधिक आहे.
विकसित राष्ट्र होण्यासाठी अनेक वर्ष लागणार
जागतिक बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, भारत आणि चीनसह अन्य १०८ देशांना विकसित राष्ट्र होण्यासाठी अनेक वर्ष लागण्याची शक्यता आहे. अहवालात म्हटल्याप्रमाणे अमेरिकेतील प्रति व्यक्ती उत्पन्नाच्या एक चुतुर्थांश हिश्श्यापर्यंत पोहचण्यासाठी भारताला आणखी ७५ वर्ष लागू शकतात. जे चीन आणि इंडोनेशिया या देशांपेक्षा देखील अधिक आहे. या देशांना आणखी १० वर्ष लागू शकतात.
हेही वाचा : ‘हा’ आहे जगातील सर्वात श्रीमंत भिकारी; मुंबईत 2 कोटींचा फ्लॅट, 8 कोटींची मालमत्ता; महिन्याची कमाई ऐकून चाट पडाल…
मात्र, भारताला त्याच ठिकाणी आणखी ७५ वर्ष विकसित राष्ट्र होण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. मात्र, भारताने आपला आर्थिक वृद्धी दर कायम ठेवल्यास, २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्याचे स्वप्न दृष्टीपथात येऊ शकते. असेही जागतिक बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे.
करावा लागतोय अनेक समस्यांचा सामना
जागतिक बँकेने वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट २०२४ या शीर्षकाखाली प्रकाशित करण्यात आलेल्या या अहवालात विकसित राष्ट्रांबाबत विस्तृत माहिती देण्यात आली आहे. या अहवालानुसार, भारत आणि चीनसह अन्य १०८ देशांना मध्यम श्रेणी कमाईवाल्या देशांच्या यादीत ठेवण्यात आले आहे. सध्याच्या घडीला या देशांतील प्रति व्यक्ती कमाई वार्षिक 95 हजार रुपये ते 11.60 लाख रुपये इतकी आहे. विकसित राष्ट्र होण्यासाठी या देशांना सध्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
कसा बनणार भारत विकसित राष्ट्र?
अहवालात म्हटले आहे की, भारताला विकसित राष्ट्र होण्यासाठी पुढील २० ते ३० वर्ष तब्बल ७ ते १० टक्के दराने आर्थिक वृद्धी कायम ठेवावी लागणार आहे. असे केले तरच भारत २०४७ पर्यंत विकसित देश बनू शकतो. अन्यथा देशाला विकसित राष्ट्र होण्यासाठी पुढील तब्बल ७५ वर्ष खर्ची करावी लागू शकतात. दरम्यान, जागतिक बँक समूहाचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ इंदरमीत गिल यांनी सांगितले आहे की, सध्याच्या मध्यम कमाईवाले देश जुन्या आर्थिक रणनीतीला चिकटून राहिले तर या शतकाच्या मध्यावधीपर्यंत अनेक विकसनशील देशांना विकसित राष्ट्र होण्यासाठी आणखी अवधी लागू शकतो.