50,000 कोटींच्या देशातील 8 हायस्पीड कॉरिडॉरला केंद्राची मान्यता; महाराष्ट्रात 'हा' कॉरिडॉर बांधला जाणार!
केंद्र सरकारने देशात 8 नवीन हायस्पीड रोड कॉरिडॉर बांधण्यास मान्यता दिली आहे. या 8 नवीन हायस्पीड रोड कॉरिडॉरवर केंद्र सरकार 50 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च करणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात बांधण्यात येणाऱ्या या रस्त्यांमुळे लोकांचा वेळ तर वाचणार आहेच, शिवाय अनेक शहरांमधील अंतर देखील कमी होणार आहे. याशिवाय इंधनाची बचत होण्यासही मदत होणार आहे. आग्रा-ग्वाल्हेर, कानपूर-लखनऊ, खरगपूर-मोरेग्राम, रायपूर-रांची, अहमदाबाद, पुणे, नाशिक, अयोध्या आणि गुवाहाटी या ८ नवीन कॉरिडॉरचे बांधकाम होणार आहे.
आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने शुक्रवारी (ता.२) या नवीन 8 कॉरिडॉरच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. या 8 हायस्पीड कॉरिडॉरची एकूण लांबी 936 किमी असणार आहे. विशेष म्हणजे 8 हायस्पीड कॉरिडॉर तयार करण्यासाठी केंद्र सरकारला 50,655 कोटी रुपये खर्च येणार आहेत. केंद्र सरकारने दावा केला आहे की, या रस्ते प्रकल्पांमुळे 4.42 कोटी दिवसांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारही निर्माण होणार आहे.
TRANSFORMATIVE boost to India’s infrastructure landscape!
The Cabinet’s approval of 8️⃣ National High-Speed Road Corridor Projects at an expenditure of over Rs. 50,000 crore will have a MULTIPLIER EFFECT on our economic GROWTH and boost EMPLOYMENT opportunities.
It also… pic.twitter.com/fim8aNP2Tr
— Narendra Modi (@narendramodi) August 2, 2024
हे आहेत आठ हायस्पीड रोड कॉरिडॉर प्रकल्प
– 6 लेन आग्रा-ग्वाल्हेर नॅशनल हाय स्पीड कॉरिडॉर
– 4 लेन खारापूर-मोरेग्राम राष्ट्रीय हायस्पीड कॉरिडॉर
– 6 लेन थरड-दिशा-मेहसाणा-अहमदाबाद राष्ट्रीय हायस्पीड कॉरिडॉर
– 4 लेन अयोध्या रिंग रोड
– 4 लेन पाथळगाव आणि गुमला रायपूर-रांची नॅशनल हाय स्पीड कॉरिडॉर
– 6 लेन कानपूर रिंग रोड
– 4 लेन उत्तर गुवाहाटी बायपास आणि सध्याच्या गुवाहाटी बायपासचे रुंदीकरण
– 8 लेन एलिव्हेटेड नाशिक फाटा-खेड कॉरिडॉर
हेही वाचा : ‘या’ देशात प्रत्येक 7 वा व्यक्ती बनलाय करोडपती; वाचा… कसे बनताय तेथील लोक श्रीमंत!
आग्रा-ग्वाल्हेर कॉरिडॉरला 4,613 कोटी खर्च
आग्रा-ग्वाल्हेर या 88 किमी लांबीच्या ग्रीनफिल्ड कॉरिडॉरमध्ये 6 लेन असणार आहे. हा कॉरिडॉर बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी मॉडेल) या तत्वावर उभारला जाणार आहे. हा रस्ता तयार करण्यासाठी 4,613 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. श्रीनगर ते कन्याकुमारी महामार्गावर पडणाऱ्या या दोन शहरांदरम्यान बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावर सध्या प्रचंड गर्दी होत आहे.
यामुळे या नवीन प्रकल्पामुळे आग्रा ते ग्वाल्हेरमधील अंतर सुमारे 7 टक्क्यांनी कमी होणार असून, प्रवासाचा वेळ सुमारे 50 टक्क्यांनी कमी होणार आहे. याच पद्धतीने सात अन्य कानपूर-लखनऊ, खरगपूर-मोरेग्राम, रायपूर-रांची, अहमदाबाद, पुणे, नाशिक, अयोध्या आणि गुवाहाटी कॉरिडॉरचे देखील बांधकाम होणार आहे.