Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळीच्या तोंडावर मोदी सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार डबल फायदा!

केंद्रातील मोदी सरकारने दिवाळीच्या तोंडावर एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या तरुणांना आणि उद्योजकांना पूर्वीपेक्षा दुप्पट कर्ज मिळणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 25, 2024 | 03:32 PM
दिवाळीच्या तोंडावर मोदी सरकारचा मोठा निर्णय; 'या' योजनेअंतर्गत मिळणार डबल फायदा!

दिवाळीच्या तोंडावर मोदी सरकारचा मोठा निर्णय; 'या' योजनेअंतर्गत मिळणार डबल फायदा!

Follow Us
Close
Follow Us:

देशभरातील अनेक तरुणांना स्वतचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्जाची आवश्यकता असते. हीच बाब लक्षात घेऊन सरकारकडून प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक तरुणांना आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून प्रगती साधता यावी, यासाठी केंद्रातील मोदी सरकारने दिवाळीच्या तोंडावर एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या तरुणांना आणि उद्योजकांना पूर्वीपेक्षा दुप्पट कर्ज मिळणार आहे.

कर्ज मर्यादेत 20 लाख रुपयांपर्यंत वाढ

प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत, मुद्रा कर्जाची मर्यादा सध्याच्या 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपये करण्यात आली आहे. या निर्णयाबाबत सरकारने अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै 2024 रोजी आर्थिक वर्ष 2024-25 चा अर्थसंकल्प सादर करताना घोषणा केली होती की, प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांची कर्ज मर्यादा वाढवून 20 लाख करण्यात येईल. आता या घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.

हे देखील वाचा – ॲफकॉन्स इंफ्रास्ट्रक्चरचा आयपीओ आजपासून खुला; वाचा… कधीपर्यंत करता येणार गुंतवणूक!

काय आहेत योजनेचे तीन महत्त्वपुर्ण टप्पे

सध्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेत शिशु, किशोर आणि तरुण अशा तीन श्रेणी आहेत. ज्या अंतर्गत कर्ज दिले जाते. आता तरुण प्लस नावाची नवीन श्रेणी सुरू करण्यात आली आहे. मुद्रा शिशु योजनेंतर्गत 50,000 रुपयांपर्यंत कर्ज देण्याची तरतूद आहे. किशोर योजनेअंतर्गत व्यवसाय करणाऱ्यांसाठी ५०,००० ते ५ लाख रुपयांपर्यंतचे मुद्रा कर्ज दिले जाते.

तरुण योजनेंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा नियम आहे. तरुण योजनेंतर्गत घेतलेले कर्ज यशस्वीरीत्या परत केलेल्या व्यावसायिकांना आता त्यांच्या व्यवसायाच्या वाढीसाठी आणि विस्तारासाठी तरुण प्लस श्रेणी अंतर्गत 10 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकणार आहे. त्यामुळे आता उद्योजकांना आपला व्यवसाय वाढविण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.

काय आहे प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना ही देशभरातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी आर्थिक सहाय्य देणारी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाच्या वाढीसाठी आवश्यक ते भांडवल सरकारकडून उपलब्ध करून दिले जाते. यामुळे अर्थव्यवस्थेत रोजगारनिर्मितीला चालना मिळते आणि देशाचा आर्थिक विकास होण्यास देखील मदत होते.

Web Title: Youth and entrepreneurs applying under pradhan mantri mudra yojana will get twice the loan than before

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2024 | 03:32 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.