झोमॅटोवरून जेवण मागवणे महागले; प्लॅटफॉर्म फीमध्ये तब्बल 40 टक्क्यांहून अधिक वाढ!
फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन फीचर लाँन्च केले आहे. याद्वारे ग्राहकांना आपल्या ऑर्डर अगोदर शेड्यूल करता येणार आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना त्यांच्या जेवणाचे वेळापत्रक दोन दिवस आधीच करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. झोमॅटोचे ‘ऑर्डर शेड्युलिंग फीचर’ अनेक शहरांमध्ये आधीच उपलब्ध आहे, ज्याचा कंपनी आता आणखी विस्तार करत आहे.
काय म्हटलंय कंपनीने आपल्या या सेवेबाबत
कंपनीचे संस्थापक आणि सीईओ दीपंदर गोयल यांनी स्वत याबाबत माहिती दिली आहे. आपल्या अधिकृत एक्स हँन्डलवर याबद्दल माहिती शेअर करताना दीपंदर गोयल यांनी म्हटले आहे की, यापुढे तुम्ही तुमची झोमॅटो ऑर्डर शेड्यूल करू शकणार आहात. तुम्ही तुमच्या जेवणाचे दोन दिवस आधीच नियोजन करू शकतात. तुमची ही ऑर्डर आम्ही वेळेत तुमच्यापर्यंत पोहोचवू. असे त्यांनी आपल्या पोस्ट म्हटले आहे.
हेही वाचा – 5 वर्षांत दिला 2128 टक्के परतावा, सलमान ब्रँड ॲम्बेसिडर असलेल्या कंपनीमुळे गुंतवणुकदारांची दिवाळी!
या शहरांमध्ये मिळणार सुविधा
सध्याच्या घडीला झोमॅटो कंपनीने दिल्ली-एनसीआर, बेंगळुरू, मुंबई, चंदीगड, जयपूर, अहमदाबाद आणि लखनऊ या देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये हे फीचर लॉन्च केले आहे. त्यामुळे आता या शहरांमध्ये ऑर्डर शेड्युलिंग सुविधा उपलब्ध होणार आहे. असेही त्यांनी म्हटले आहे. कंपनीने सध्या केवळ मोठ्या ऑर्डरसाठी आपले ‘ऑर्डर शेड्युलिंग’चे फिचर लागू केले आहे. भविष्यात सर्व ऑर्डरसाठी ते लागू केले जाणार आहे. सध्या कंपनी केवळ 1,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ऑर्डरवर या फीचरचा लाभ देत आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
इंटरसिटी लीजेंड्स सेवा बंद
दरम्यान, काही दिवसांपूर्वी झोमॅटोने आपली इंटरसिटी लीजेंड्स सेवा तात्काळ बंद करण्याची घोषणा केली होती. याबाबत माहिती देताना कंपनीचे सीईओ दीपंदर गोयल यांनी म्हटले होते की, दोन वर्षांच्या प्रयत्नांनंतरही योग्य बाजारपेठ न मिळाल्याने, आम्ही ही सेवा तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर जुलै महिन्यात कंपनीने काही दिवसांसाठी आपली इंटरसिटी लीजेंड्स सेवा बंद केली होती. त्यात बदल करण्याबाबत बोलले होते. मात्र, आता नफा न मिळाल्याने कंपनीने ही सेवा थेट बंदच केली आहे.