Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय ! संशोधन क्षेत्रासाठी ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ योजनेला मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळाने  ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ या नव्या योजनेला मंजुरी दिली. यामुळे शैक्षणिक आणि संशोधन संस्थांना शास्त्रीय संशोधन लेख, जर्नल प्रकाशनांमध्ये प्रवेश मिळणार आहे. 6000 कोटींचा निधी मंजूर केला आहे.

  • By नारायण परब
Updated On: Nov 26, 2024 | 11:40 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

केंद्रीय मंत्रिमंडळाने  ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ या नव्या योजनेला मंजुरी दिली. या योजनेद्वारे देशभरातील शैक्षणिक आणि संशोधन संस्थांना शास्त्रीय संशोधन लेख आणि जर्नल प्रकाशनांमध्ये प्रवेश मिळणार आहे. तीन वर्षांसाठी म्हणजेच 2025, 2026 आणि 2027 या कॅलेंडर वर्षांसाठी या केंद्रीय योजनेसाठी सुमारे 6,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मोखाड्यात प्राथमिक शिक्षण हक्क कायदा धाब्यावर; विद्यार्थी भौतिक सुविधांपासून वंचित

योजनेचा उद्देश आणि महत्त्व

‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ योजना उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेतील प्रवेश वाढवण्यासाठी केंद्र सरकारने मागील दशकात घेतलेल्या शैक्षणिक पुढाकारांवर आधारित आहे. देशातील तरुणांना दर्जेदार उच्च शिक्षण उपलब्ध करून देणे आणि संशोधन व नवकल्पनांना प्रोत्साहन देणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. यामुळे अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन (ANRF) अंतर्गत संशोधन व विकासाला चालना मिळेल. सरकारी विद्यापीठे, महाविद्यालये, संशोधन संस्थानं आणि प्रयोगशाळांमध्ये संशोधन संस्कृती विकसित होईल.

लाभार्थी आणि संस्था

या योजनेचे फायदे केंद्र किंवा राज्य सरकारच्या व्यवस्थापनाखालील सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना आणि केंद्र सरकारच्या संशोधन व विकास संस्थांना मिळतील. ही योजना इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क (INFLIBNET) द्वारे समन्वित केली जाईल. INFLIBNET हे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) अंतर्गत असलेले स्वायत्त आंतरविद्यापीठ केंद्र आहे.

योजनेचा लाभ 6,300 हून अधिक संस्थांना मिळणार आहे, ज्यामध्ये सुमारे 1.8 कोटी विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधक यांचा समावेश असेल. यामुळे विकसित भारत @2047, राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020, आणि ANRF च्या उद्दिष्टांशी सुसंगत उद्दिष्टांची पूर्तता होईल.

योजनेचे फायदे आणि परिणाम

विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा विस्तार- देशभरातील विद्यार्थ्यांना शास्त्रीय जर्नल्समध्ये सहज प्रवेश मिळेल.

संशोधनाला चालना- या योजनेतून टियर 2 आणि टियर 3 शहरांतील विद्यार्थ्यांना व संशोधकांना दर्जेदार जर्नल्स आणि संशोधन प्रकाशने उपलब्ध होतील, ज्यामुळे मूलभूत आणि बहुविषयक संशोधनाला चालना मिळेल.

संशोधन लेखनास प्रोत्साहन- ANRF भारतीय संशोधन लेखनाचा योगदानाचा आढावा घेऊन वेळोवेळी सुधारणा सुचवेल.

संपूर्ण शैक्षणिक प्रगती- प्रगत तंत्रज्ञान आणि ज्ञानाच्या आधारावर शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक घटकाला फायदा मिळेल.

DPIIT आणि WinZO मध्ये सामंजस्य करार; सेंटर ऑफ एक्‍सलन्‍सद्वारे गेमिंग क्षेत्राचा केला जाणार विकास

एकसंध पोर्टलचा वापर

वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजनेअंतर्गत उच्च शिक्षण विभागाने एकसंध पोर्टल सुरू करणार आहे. या पोर्टलद्वारे संस्थांना विविध शास्त्रीय जर्नल्समध्ये प्रवेश मिळेल. हे पोर्टल वापरण्यास सुलभ असेल, ज्यामुळे माहितीचा प्रसार वेगाने आणि प्रभावीपणे होईल.

‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ ही योजना भारतातील विद्यार्थ्यांसाठी, प्राध्यापकांसाठी आणि संशोधकांसाठी ज्ञान, संशोधन आणि विकासाचे नवीन दालन खुले करणार आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाला बळ देत, शास्त्रीय संशोधनासाठी आवश्यक असलेल्या साधनसामग्रीचा प्रवेश सर्वांना सहज मिळेल, ज्यामुळे भारताला संशोधन आणि नवकल्पनांच्या क्षेत्रात नवी उंची गाठता येईल.

Web Title: %e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af %e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be %e0%a4%ae

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2024 | 11:40 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.