Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांधकाम कामगारांसाठी राज्यात 304 सेतू केंद्र सुरु, तालुक्याच्या ठिकाणी करता येणार नोंदणी

राज्याच्या विकासात बांधकाम क्षेत्राचे मोठे योगदान आहे. याच बांधकाम क्षेत्रात लाखो कामगार काम करत असतात, जी आपली गावे मागे सोडून शहरात राहत असतात. याच बांधकाम कामगारांसाठी राज्यात 304 सेतू केंद्र चालू झाले आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 05, 2024 | 10:11 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

बांधकाम क्षेत्र हे दिवसेंदिवस मोठे होत आहे. आज आपल्याला शहरी भागात अनेक गगनचुंबी इमारती पाहायला मिळतात. याचे श्रेय हे जेवढे एका इंजिनिअरच आहे तेवढेच एका बांधकाम कामगाराचे सुद्धा आहे. याच कामगाराला सरकारी कामांच्या नोंदणीसाठी आपल्या गावी जावे लागते. हीच समस्या लक्षात घेऊन राज्य सरकाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने एक नवीन प्रकल्प राबविण्यात आला आहे. तालुक्याच्या ठिकाणी जे बांधकाम कामगार आहेत त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन नोंदणी करावी लागते. रोजंदारी कामगार असल्याने त्यांचा त्या दिवसाचा खाडा पडतो. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी ‘तालुका कामगार सुविधा केंद्र’ अर्थात सेतू केंद्र स्थापन करण्यात आले आहे. आज राज्यात 358 सेतू केंद्र चालू करावयाचे असून यातील 304 सेतू केंद्राचे आज ऑनलाईन उद्घाटन केले असल्याची माहिती कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी दिली.

हे देखील वाचा: राज्य कौशल्य विद्यापीठामुळे रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध: कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

महाराष्ट्र महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सेतू केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, व इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कामगार मंत्री डॉ.खाडे म्हणाले की, कामगारांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या, तर त्यांनी या हक्काच्या सेतूमध्ये येऊन नोंदणी किंवा अन्य सोयी सुविधा देण्यासाठी हे सेतू केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचबरोबर कामगारांना ज्या सुविधा देण्यात येतात, त्याबाबतची पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याचीही माहिती देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

हे देखील वाचा: महापारेषणमध्ये वीजतंत्री पदांसाठी मोठी भरती; ‘ही’ असेल अर्जासाठी शेवटची मुदत!

मंत्री डॉ. खाडे पुढे म्हणाले की, नवी मुंबईतील वाशी येथे 25, 26 आणि 27 सप्टेंबर 2024 रोजी बॉयलर इंडियाचे मोठे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यामध्ये बॉयलर तसेच विदेशी बॉयलरचे विविध प्रकार व दर्जा पाहिला जाणार असून त्याबाबत मार्गदर्शनही केले जाणार आहे.

तसेच कामगार न्यायालयातील न्यायाधीशांच्या वेतनाचा प्रश्न होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयांचे तंतोतत पालन करून त्यांच्या वेतनाचा प्रश्न मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला आणि तो मंजूर झाला असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

Web Title: 304 setu kendra suru has been started for construction workers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2024 | 10:11 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.