मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी असणार आहे. याभरतीप्रक्रियेसंबंधी जाहिरात कॉर्पोरेशनकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायाचे आहेत. या भरतीकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 डिसेंबर 2024 आहे. जाणून घेऊया या भरतीप्रक्रियेबद्दल
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये सुरु असलेली भरती ही तीन पदांकरिता आहे. त्यामध्ये सहाय्यक महाव्यवस्थापक, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता – II या पदांचा समावेश आहे.
पद आणि जागा
सहाय्यक महाव्यवस्थापक- 1 जागा
उपअभियंता – 05 जागा
कनिष्ठ अभियंता – II – 01 जागा
सहाय्यक महाव्यवस्थापक (सिव्हिल) पद पात्रता निकष
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल अभियांत्रिकी पूर्ण वेळ पदवी धारण केलेली असावी.
वयोमर्यादा- या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमाल 35 वर्षांपर्यंत असावे. शिथिलतेबद्दल जाहिरातीत नमूद केले आहे.
वेतन- निवड झालेल्या उमेदवाराला 70 हजार ते 2 लाख रुपये एवढे मानधन दिले जाणार आहे.
उपअभियंता (सिव्हिल) पद पात्रता निकष
शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल अभियांत्रिकी पूर्ण वेळ पदवी धारण केलेली असावी.
वयोमर्यादा- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमाल 35 वर्षांपर्यंत असावे. वयाच्या शिथिलतेबद्दल जाहिरातीत नमूद केले आहे.
वेतन- निवड झालेल्या उमेदवाराला 50 हजार ते 1 लाख 60 हजार रुपये एवढे मानधन दिले जाणार आहे.
कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) पद पात्रता निकष
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठ/कॉलेजमधून सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ पदवी/डिप्लोमा.
वयोमर्यादा- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जास्ती जास्त 35 वर्षांपर्यंत (वयाच्या शिथिलतेसाठी जाहिरात वाचावी)
वेतन- निवड झालेल्या उमेदवाराला 35280 ते 67,920 रुपये वेतन असणार आहे.
नोकरीचे ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
निवड प्रक्रिया
आलेल्या अर्जाची पडताळणी करून थेट मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड करण्यात येईल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
या भरतीप्रक्रियेकरिता अर्ज करण्यासाठी 28 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता-
सीनियर डेप्युटी जनरल मॅनेजर (एचआर), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, एमएमआरसीएल-लाइन 3 ट्रान्झिट ऑफिस, ई ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051
उमेदवारांसाठी महत्वाची सूचना
i वय, पात्रता आणि अनुभव 01 नोव्हेंबर 2024 रोजी असेल.
ii शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत, UGC/ AICTE द्वारे मान्यताप्राप्त संस्थेच्या व्यतिरिक्त; त्या संस्थेने दिलेली विशिष्ट पदवी/डिप्लोमा देखील मान्यताप्राप्त पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
iii वरील पदासाठी अर्ज करताना, अर्जदाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की तो/तिने पात्रता पूर्ण केली आहे आणि निर्दिष्ट तारखांना वर नमूद केलेले निकष आणि त्याने/तिने सादर केलेले तपशील सर्व बाबतीत योग्य आहेत. भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर असे आढळून आले की उमेदवाराने पात्रता निकषांची पूर्तता केली नाही आणि/किंवा त्याने/तिने कोणतीही चुकीची/खोटी माहिती दिली आहे किंवा कोणतीही वस्तुस्थिती दडवली आहे, तर त्याची/तिची उमेदवारी रद्द केली जाईल. . नियुक्तीनंतरही यापैकी कोणतीही कमतरता आढळल्यास/तिच्या सेवा बंद केल्या जाऊ शकतात.
iv MMRCL रिक्त पदांची संख्या बदलण्याचा आणि भरती प्रक्रियेदरम्यान आवश्यक असल्यास, पुढे जारी न करता रद्द/प्रतिबंधित/सुधारणा/बदल आणि भरतीचे निकष बदलण्याचा अधिकार राखून ठेवते.
सूचना देणे किंवा त्याचे कोणतेही कारण देणे.
v. देय तारखेनंतर प्राप्त झालेले अपूर्ण अर्ज किंवा अर्ज सरसकट नाकारले जातील. पोस्टमधील नुकसान/विलंबासाठी MMRCL जबाबदार नाही.
इतर सूचना जाहीरातीमध्ये आहेत. त्यामुळे जाहिरात वाचावी
जाहिराती करिता इथे क्लिक करा.