फोटो सौजन्य - Social Media
दरवर्षीं अनेक विद्यार्थी महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तयारी करत असतात. या तयारीदरम्यान विद्यार्थी सामान्य ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. म्हणले जाते कि, MPSC ची परीक्षा देशांतील कठीण परीक्षांपैकी एक आहे. त्यामुळे या परीक्षेच्या तयारीमध्ये विद्यार्थी स्वतःला ओतून घेत असतात. दरम्यान, नुकतेच महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पार पडली. १ डिसेंबर रोजी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत अनेक प्रश्न विचारण्यात आले, ज्यांनी विद्यार्थ्यांना विचार करण्यास भाग पाडले. त्यातील सर्वात विशेष अशा एक प्रश होता, ज्याने संपूर्ण शैक्षणिक विभागाचे लक्ष खेचून घेतले. या परीक्षेमध्ये असा नक्की कोणता प्रश्न विचारण्यात आला? चला तर मग जाणून घेऊयात…
महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC)ने आयोजित केलेल्या परीक्षेमध्ये विविध प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये मद्यासंबंधित प्रश्न विचारला गेला आहे. हा प्रश्न या परीक्षेच्या प्रश्नसंचातील सर्वात आकर्षित आणि चर्चेचा विषय बनला आहे. या प्रश्नसंचामध्ये विचारण्यात आलेला मद्यासबंधीत हे प्रश्न आणि त्यासाठी देण्यात आलेले पर्याय विद्यार्थ्यांसाठी आक्षेपार्य ठरले आहे.
नक्की असा कोणता प्रश्न विचारण्यात आला आहे?
तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करत आहेत. जर तुम्हाला त्यांच्या सोबत जायचे नसेल आणि त्यांच्या अल्कोहोल सेवन करण्याच्या सवयीपासून स्वतःला बाहेर ठेवायचे असेल तर तुम्ही काय कराल ?
या प्रश्नाच्या उत्तरासाठी देण्यात आलेले पर्याय:
एकूण ४ पर्याय या प्रश्नासाठी देण्यात आले होते. पर्याय खालीलप्रमाणे आहेत.
1) मी माझ्या मित्रांना सांगेन की माझ्या पालकांना मला दारू पिण्यास मनाई केली आहे.
2) दारू पिण्यास नकार देईन.
3) फक्त तुमचे मित्र मद्यपान करत आहेत म्हणून मद्यपान करेन.
4) नकार देईन आणि त्यांना खोटे सांगेन की तुम्हाला यकृताचा आजार आहे.
मुळात, विद्यार्थ्यांच्या मते आक्षेपार्य आहेच, त्याचबरोबर देण्यात आलेले उत्तरांचे पर्यायदेखील विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारे असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. असे प्रश्न इतक्या महत्वाच्या परीक्षेत कसे टाकू शकतात? असा प्रश्न काही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. तसेच या अशा प्रश्नांची खरोखरच गरज आहे का? असा सवाल लोकांनी उपस्थित केला आहे. काहींचे म्हणणे आहे कि,” या परीक्षेतून पात्र होणारे विद्यार्थी भविष्यातील टॉप शासकीय अधिकारी असतील. तर त्यांच्यासाठी असे दारू संबंधित प्रश्न विचारणे योग्य नाही.” याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.