फोटो सौजन्य - Social Media
स्टाफ सिलेक्शन कमिशनने काही महिन्यांपूर्वी एका भरती प्रक्रियेला सुरुवात केली होती. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून जनरल ड्युटी पदांसाठी उमेदवारांना नियुक्त करण्याची योजले होते. मुख्य म्हणजे या भरती प्रक्रियेत अर्ज करण्याची मुभा केव्हाची संपली आहे. उमेदवारांना या भरतीसाठी आता अर्ज करता येणार नाही. असंख्य उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले होते. वेळे मर्यादेच्या आत अर्ज केलेल्या उमेदवारांना नियुक्तीची संधी प्राप्त होणार आहे. त्यासाठी त्यांना मुख्य परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे, तसेच निवड प्रक्रियेच्या इतर टप्प्यांना पार करावे लागणार आहे. जर तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या जनरल ड्युटीच्या या भरतीसाठी अर्ज केला होता तर त्यात सुधार करता येणार आहे. जर भरलेल्या अर्जामध्ये काही त्रुटी आढळून येत आहेत, तर त्यामध्ये आता सुधार करण्याची मुभा देण्यात आली आहे. एका विशिष्ट काळ मर्यादेत ही सुधार प्रक्रिया पार करायची आहे.
हे देखील वाचा : CA च्या परीक्षेची तयारी करताय? जाणून घ्या परीक्षेच्या तयारीसाठी काही टिप्स
5 सप्टेंबर 2024 रोजी या भरती प्रक्रिया संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. या अधिकृत अधिसूचनेत या भरती संदर्भात सखोल माहिती नमूद होती. मुळात, याच दिवशी भरतीच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. उमेदवारांना ऑक्टोबरच्या 14 तारखेपर्यंत अर्ज करण्याची उभा देण्यात आली होती. तर भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करताना अर्ज शुल्क भरायचे होते. सामान्य श्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरायचे होते. तर ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना देखील 100 रुपये अर्ज शुल्क भरायचे होते. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती आणि माजी सैनिकांना व महिलांना अर्ज शुल्क माफ होते. उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात अर्ज शुल्क भरायचे होते. ऑक्टोबरच्या 15 तारखेपर्यंत अर्ज शुल्क भरण्याची मुभा देण्यात आली होती.
अर्जाचा फॉर्म भरल्यानंतर जर उमेदवारांना त्यात काही त्रुटी आढळून आल्या तर त्यात सुधार करण्याची वेळ देण्यात आली आहे. अर्जाचा फॉर्म मधले त्रुटी 5 नोव्हेंबर 2024 ते 7 नोव्हेंबर 2024 या कालावधी दरम्यान सुधारता येणार आहे. उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. या भरती संदर्भात परीक्षा जानेवारी 2025 किंवा फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित करण्यात येईल. परीक्षेच्या अगोदर उमेदवारांसाठी प्रवेश पत्र जाहीर करण्यात येईल. परीक्षेला उपस्थित राहताना उमेदवारांना सोबत प्रवेश पत्र आणणे अनिवार्य असणार आहे, त्याशिवाय उमेदवारांना परीक्षेसाठी उपस्थित राहता येणार नाही.
हे देखील वाचा : विद्यार्थ्यांमध्ये वाढतोय मानसिक त्रास; शैक्षणिक संस्थांनी अशा प्रकारे वाढवावे मानसिक बळ
एसएससीच्या या भरती प्रक्रियेत 39,481 रिक्त पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. या रिक्त जागांमध्ये बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, एसएसबी, आयटीबीपी, एसएसएफ आणि एनसीबी विभागातील विविध रिक्त पदांचा समावेश आहे. त्या भरती प्रक्रिया सखोल माहिती वाचण्यासाठी उमेदवारांनी अधिसूचनेचा आढावा घ्यावा.