फोटो सौजन्य - Social Media
भारतीय स्टेट बँक (SBI) ने पुन्हा एकदा स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीत एकूण १२२ पदे भरण्यात येणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. जे उमेदवार यापूर्वी अर्ज करू शकले नव्हते, त्यांना आता ऑनलाईन अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.
या भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय २५ वर्षे आणि कमाल वय ३५ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. सरकारच्या नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयात सूट मिळेल. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांना ५ वर्षे, ओबीसी उमेदवारांना ३ वर्षे, तर दिव्यांग उमेदवारांना जास्तीत जास्त १० वर्षांची सूट दिली जाईल.
शैक्षणिक पात्रता म्हणून उमेदवाराकडे पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच त्यांना बॅलन्स शीट समजणे, अप्रेझल तयार करणे, क्रेडिट प्रस्तावांचे मूल्यमापन आणि क्रेडिट मॉनिटरिंग याबाबतचे ज्ञान आणि अनुभव असणे गरजेचे आहे. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹८५,९२० ते ₹१,०५,२८० इतके वेतन मिळेल. त्याशिवाय बँकेकडून इतर भत्ते आणि सुविधा देण्यात येतील, ज्यामुळे एकूण पगार पॅकेज आणखी आकर्षक ठरेल.
निवड प्रक्रिया पूर्णपणे मुलाखतीच्या आधारे होणार आहे. SBI कडून १०० गुणांची मुलाखत घेतली जाईल आणि त्याच कामगिरीच्या आधारावर अंतिम निवड केली जाईल. यावेळी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. अर्ज दारांना अर्ज करताना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. हे अर्ज शुल्क भरण्यासाठी उमेदवारणनी नेट बँकिंगचा वापर करावा. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्ज शुल्काची एकूण रक्कम ७५० रुपये निश्चित करण्यात आले आहे. तर SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांना अर्ज शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आला आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून उमेदवारांनी sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी, आवश्यक माहिती भरावी, पात्रता आणि अनुभवाचे कागदपत्रे अपलोड करून शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट करावा. शेवटी अर्जाचा प्रिंट आउट घेणे आवश्यक आहे.