फोटो सौजन्य - Social media
रेल्वे रिक्रुटमेंट सेलने भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून ग्रुप सी आणि ग्रुप डी मधील विविध पदांचा विचार केला जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात केले गेले आहे. भारतीय रेल्वेमध्ये भरती होऊ पाहणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना १९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना वेळेच्या मर्यादेत राहून अर्ज करण्याचे आव्हान RRC कडून करण्यात आले आहे.
हे देखील वाचा : पुण्यात अकरावीच्या प्रवेशाची अंतिम संधी; अशा प्रकारे करता येईल अर्ज
RRC च्या या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी काही गोष्टींना पात्र असणे अनिवार्य आहे. या अटी आणि शर्ती शैक्षणिक आहेत तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादे संबंधित आहेत. किमान दहावी शिक्षण असणारे उमेदवारदेखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात. लेव्हल १ च्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १८ आहे तर जास्तीत जास्त ३३ वय असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. लेव्हल २ च्या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कमीत कमी १८ वर्षे आयु असणारा हवा तर जास्तीत जास्त ३० वर्षे वय असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
या भरतीसाठी अर्ज करू पाहणार्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. जनरल/ओबीसी आरक्षित प्रवर्गातून आलेले उमेदवारांना ५०० रुपये अर्ज शुल्क भरावयाचे आहे. तर एससी/एसटी/भूतपूर्व सैनिक/दिव्यांग व्यक्ति (पीडब्ल्यूडी)/महिला/ट्रांसजेंडर/अल्पसंख्यक उमेदवारांना देखील ५०० रुपये अर्ज शुल्क भरायला लागणार आहे. तर आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाला अर्ज शुल्क म्हणून २५० रुपये भरायचे आहे. निवड प्रक्रियेमध्ये लिखित परीक्षा तसेच दस्तऐवजांच्या पडताळणीचा समावेश आहे. यांना पात्र उमेदवारच नियुक्तीस पात्र ठरणार आहे. यासंदर्भात अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरती विषयक अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.
हे देखील वाचा : ‘करा घरबसल्या शिलाई, होईल चांगली कमाई’; महिलांसाठी उत्तम संधी, त्वरित करा अर्ज
ग्रुप सी लेव्हल २: सातव्या CPC च्या अंतर्गत मॅट्रीकनुसार १९,९०० रुपये ते ६३,२०० रुपये इतके मिळेल.
ग्रुप डी लेव्हल १: सातव्या CPC च्या अंतर्गत मॅट्रीकनुसार १८,००० रुपये ते ५६,९०० रुपये इतके मिळेल.