'Biotech मध्ये करिअर करण्याची मोठी संधी'; बायोस्किल-२०२६’ परिषदेत तज्ज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
परिषदेचे उद्घाटन कुलगुरू प्रा. डॉ. राकेशकुमार शर्मा, डॉ. एस. आर. यादव, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा वरिष्ठ प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सय्यद जी. दस्तगर यांच्या हस्ते झाले. यावेळी संशोधन संचालक प्रा. डॉ. पी. एस. पाटील, प्रा.डॉ.सी.डी. लोखंडे, प्रा.डॉ. के. डी. सोनवणे, प्रा.डॉ. अर्पिता पांडे-तिवारी, डॉ. रेश्मा पवार, डॉ. शिया शर्मा, डॉ. शिवाजी काष्टे, डॉ. पद्मजा देसाई, डॉ. रजनी बनसोडे, डॉ. मेधा देसाई, डॉ. अश्विनी काळे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. सय्यद दस्तगर म्हणाले, जैवतंत्रज्ञान क्षेत्रात नैसर्गिक व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर वाढविण्याची गरज असून, बॅक्टेरियल नैनोसेल्युलोज है भविष्यातील उपयुक्त साहित्य ठरणार आहे बैक्टेरियल नॅनोसेल्युलोजची नैनो-फायब्रिलर रचना व उच्च जलधारण क्षमता यामुळे ते पेशींचे स्थिरीकरण व पाढीसाठी अनुकूल ठरते.
वैद्यकीय, औषधनिर्मिती, ऊतक अभियांत्रिकी, तसेब अन्न व पॅकेजिंग उद्योगात त्याचा व्यापक वापर होऊ शकतो, कुलगुरू डॉ. शर्मा यांनी जैवतंत्रज्ञान, स्टेम सेल व पुनरुत्पादक औषधशास्त्र या क्षेत्रातील करिअर संधीवर मार्गदर्शन केले, त्यांनी या क्षेत्रातील संशोधन, आरोग्यविषयक उपयोग आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींचा आढावा घेतला, परिषदेत एकूण १० महाविद्यालयांमधून १३० प्रतिनिधी उपस्थित होते. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आ. सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.
इच्छा असूनही नोकरी सोडू शकत नाही? तुम्ही पण ‘Job Hugging’ चे बळी ठरला आहात का? नेमकं आहे तरी काय?






