फोटो सौजन्य - Social Media
नॅशनल इन्स्टिटयूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ (NIRRH) ने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. मुंबईमध्ये कामाच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. जर तुम्ही मुंबई विभागामध्ये कामाच्या संधीच्या शोधात आःआत किंवा नोकरी शोधात आहात तर नक्कीच NIRRH च्या या भरतीबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. यामध्ये विविध जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून या पदांसाठी अर्ज करण्यास जे उमेदवार इच्छुक असतील त्यांना अर्ज करता येणार आहे. तसेच या भरती संदर्भात जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी या जाहिरातीचा आढावा घ्यावा.
हे देखील वाचा : विवा महाविद्यालयात जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा; विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आले विविध उपक्रम
प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट, ज्युनियर नर्स, आयुर्वेद विभागातील वरिष्ठ संशोधन फेलो तसेच डेटा एंट्री ऑपरेटरच्या पदासाठी ही भरती प्रक्रिया आयोजली आहे. एकूण ४ रिक्त पदांसाठी या भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेत प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट पदासाठी १ जागा रिक्त आहे. ज्युनियर नर्सच्या पदासाठी देखील १ जागा रिक्त आहे. तर आयुर्वेद विभागातील वरिष्ठ संशोधन फेलो आणि डेटा एंट्री ऑपरेटरच्या पदासाठी प्रत्येकी १ जागा रिक्त आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
जाहिरातीत नमूद असलेल्या शैक्षणिक अटींनुसार, प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्टच्या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार MBBS मध्ये पदवीधर असावा. वरिष्ठ संशोधन फेलोच्या पदासाठी अर्ज कर्ता उमेदवार BAMS मध्ये पदवीधर असावा. प्रोजेक्ट नर्सच्या पदासाठी अर्ज कर्त्या उमेदवाराने सहाय्यक नर्स आणि मिडवाइफ हा कोर्स केलेला असावा. तर HSC उत्तीर्ण उमेदवार डेटा एंट्री ऑपरेटरच्या पदासाठी अर्ज करू शकतात. नियुक्त झालेल्या उमेदवारांना मुंबई येथे काम करता येईल. एकंदरीत, अर्ज करताय उमेदवाराचे वय ४० वर्षे असणे अनिवार्य आहे. ४० वर्षीय उमेदवारालाच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
NIRRH च्या या भरतीच्या प्रक्रियेमध्ये उमेदवारांना मुलाखत पात्र करावी लागणार आहे. मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मुलाखत २८ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे. मुलाखतीसाठी उमेदवारांना “ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ, जेएम स्ट्रीट, परळ, मुंबई – ४०००१२” या पत्त्यावर जावे लागणार आहे.