फोटो सौजन्य - Social Media
भारतीय वायू दलाकडून काही दिवसांपूर्वी अग्नीवर वायू सिलेक्शन टेस्टला सुरुवात करण्यात आली होती. या भरतीसाठी निवड प्रक्रियेत परीक्षेचा समावेश होता. महत्वाची बाब अशी आहे कि या परीक्षेची तारीख १८ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली होती. नुकतेच या तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे. या संबंधित अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार, Agnipath Vayu Agniveer Intake 02/2025 Batch साठी परीक्षा १६ नोव्हेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
हे देखील वाचा : ITBP ने केली भरतीला सुरुवात; ५४५ पदांसाठी होणार उमेदवारांची नियुक्ती, त्वरित करा अर्ज
या परीक्षेसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांनी या बाबतीची नोंद घ्यावी किमी फेज १ मध्ये आयोजित जाणारी परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येणार आहे. या परीक्षे संदर्भात असलेले प्रवेशपत्र लवकरच उमेदवारांना पुरवण्यात येणार आहे. हे प्रवेश पत्र उमेदवारांना परीक्षेच्या काही दिवसांआधी पुरवण्यात येईल. उमेदवारांनी ही बाब लक्षात घ्यावी कि उमेदवारांना प्रवेश पत्र ऑनलाईन डाउनलोड करता येणार आहे. प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी agnipathvayu.cdac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
या वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर प्रवेश पत्राच्या संबंधित असणाऱ्या लिंकवर क्लिक करावे लागणार. लॉग इन क्रेडेंशियल दर्ज करून सबमिट केल्यावर आपल्या समोर प्रवेश पत्र उघडेल. भविष्यातील गरजेसाठी या प्रवेश पत्राला डाऊनलोड करा आणि त्याची एखादी प्रत स्वतःजवळ ठेवा. अग्नीवर वायूच्या पदांसाठी नियुक्ती होणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या अनुभव आणि कामाच्या वर्षानुसार त्यांना वेतन पुरवला जाईल. दरम्यान, प्रथम वर्षात उमेदवाराला ३०,००० रुपये वेतनमान पुरवले जाईल. दुसऱ्या वर्षासाठी ३३,००० रूपये वेतनमान दिले जाईल.
हे देखील वाचा : मारुती ड्रोन खरेदी करणाऱ्यांना मिळणार मोफत प्रशिक्षण; विनामूल्य शिकता येणार ड्रोन उडवण्याचे टेक्निक
तीन वर्षांचा अनुभव घेतलेल्या उमेदवाराला ३६,५०० रुपये वेतनमान पुरवले जाईल, तर कामेच्छा ठिकाणी चार वर्ष काढलेल्या उमेदवाराला ४०,००० वेतनमान पुरवले जाईल. हे वेतनमान इन हॅन्ड नसून, उमेदवाराला पहिल्या वर्षी २१,००० रुपये, दुसरे वर्ष २३,१०० रुपये, तिसरे वर्ष २३,५८० रुपये तर चौथ्या वर्षी २८,००० रुपये इन हॅन्ड वेतनमान पुरवण्यात येईल. या भरती विषयक अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेचा आढावा घ्या.