Insurance in the coming times: Know the changes in career and job opportunities in the insurance sector
Insurance Sector : भारत हा सर्वसाधारण विमा क्षेत्रातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे. वर्ष 2026 पर्यंत भारताच्या विमा बाजारपेठेचा आकार अंदाजे 222 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचेल, असा अनुमान आहे. हा विस्तार वाढती जागरूकता आणि विविध प्रकारच्या विमा उत्पादनांच्या मागणीमुळे प्रेरित झाला आहे. त्यामुळे उद्योगाची प्रभावी वाढ होत आहे. नोकरीच्या जाहिरातींमध्ये दरमहा 5.71% वाढ दिसून येत आहे. भारत 2032 पर्यंत सहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा विमा बाजार बनण्याच्या मार्गावर आहे, ज्यामुळे उद्योगातील सर्व विभागांमध्ये रोजगाराच्या संधी सुधारत असून त्यांना आणखी चालना मिळत आहे.
व्यापक श्रेणीतील विविध करिअर मार्ग
विमा उद्योगातील वाढीमुळे करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. त्याचा जीवन विमा क्षेत्र आणि जीवन विमा नसलेले क्षेत्र या दोन्ही क्षेत्रांमध्ये विस्तार आहे. सर्वसाधारण विमा क्षेत्र हे विविधतेने भरलेले असून ते युनिक आहे. त्यात आरोग्य, मोटर, घर, औद्योगिक, गट आरोग्य, प्रवास आणि अगदी गुरेढोरे आणि साहसी क्रीडा विमा यासारख्या निश (एक विशिष्ट आणि लहान मार्केट सेगमेंट किंवा क्षेत्र) विभागांचा समावेश आहे. विविधता अशा भूमिका निर्माण करते ज्या विविध पात्रता आणि कौशल्यांना सामावून घेतात. म्हणजेच, विविधता ही विविध क्षमता आणि ज्ञान असणार्या लोकांसाठी योग्य भूमिका निर्माण करण्याचे काम करते.
तांत्रिक भूमिकांसाठी, विशेष कौशल्याची मागणी आहे. जसे केमिकल इंजिनिअर्स रिस्क इंजिनिअरिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकतात, मेकॅनिकल इंजिनिअर्स आणि ऑटोमोबाईल इंजिनिअर्स अंडररायटिंग आणि मोटर दाव्यांमध्ये संधी शोधू शकतात आणि कायदेशीर व्यावसायिक कॉर्पोरेट कायदेशीर भूमिका तसेच तृतीय-पक्षाच्या दाव्यांच्या व्यवस्थापनात जबाबदाऱ्या घेऊ शकतात. डॉक्टर्स आणि फार्मा पदवीधर तसेच वैद्यकीय व्यावसायिक, उत्पादन विकास, अंडररायटिंग आणि आरोग्य विमा उपक्षेत्रांतल्या दावे व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. चार्टर्ड अकाउंटंट्ससारख्या वित्त व्यावसायिकांकडे वित्त, अंतर्गत लेखापरीक्षण (ऑडिट) आणि एंटरप्राईझ जोखीम व्यवस्थापनात विविध करिअर मार्ग आहेत.
जसजसे हे क्षेत्र विकसित होत आहे, तसतसे पारंपारिक विक्रीच्या भूमिकांपेक्षा इतर अन्य क्षेत्रांमध्ये कौशल्याची मागणी वाढत आहे. आधुनिक विमा कंपन्या अशा व्यावसायिकांना शोधत असतात ज्यांना उत्कृष्ठ विश्लेषण कौशल्य, समस्या सोडवण्याच्या क्षमता आणि नैतिक मानकांबद्दल दृढ वचनबद्धता असेल. विमा उद्योगात जे बदल होत आहेत ते पॉकेट विमा आणि ॲडव्हेंचर स्पोर्ट्स कव्हरेज यासारख्या नाविन्यपूर्ण उत्पादनांकडे होत आहे. (पॉकेट विमा हा एक प्रकारचा विमा पॅकेज आहे जो अतिशय कमी स्वरूपाचा आणि साधारणपणे स्वस्त असतो. ही पॉलिसी लहान श्रेणीतील विमाकवच पुरवते आणि विशिष्ट गरजांची पूर्तता करते, जसे की कमी कालावधीसाठी किंवा विशिष्ट कार्यासाठी विमा संरक्षण) यातून असे दिसून येते की विमा उद्योग ग्राहकांच्या नवीन गरजा आणि मागण्या ओळखून त्यानुसार सर्जनशील उपाय शोधत आहे.
नियामक लँडस्केपमध्ये (परिस्थितीमध्ये) देखील महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. “2047 पर्यंत सर्वांसाठी विमा” हे IRDAI (Insurance Regulatory and Development Authority / भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण) चे महत्त्वाकांक्षी ध्येय साध्य करण्याचे जोरदार प्रयत्न होत आहेत. या बदलामुळे प्रशासन आणि ग्राहक-केंद्रित उपाययोजनांवर केंद्रित असलेल्या भूमिकांमध्ये वाढ झाली आहे. यात विविध विभागांतील किंवा कार्यांतील लोकांसाठी किंवा भूमिकांसाठी मजबूत आंतरवैयक्तिक (व्यक्तींमधील संबंध किंवा संवाद) कौशल्यांची गरज आणखी स्पष्ट होते.
विमा क्षेत्र पारंपारिक पद्धतींपासून बरेच पुढे आले आहे. ते आता नवकल्पना, डिजिटल परिवर्तन आणि ग्राहक-केंद्रित निराकरणाचे केंद्र म्हणून उदयास आले आहे. जसजसा त्याचा विस्तार होत आहे, तसतसे उद्योगात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत ज्या विविध कौशल्ये आणि तज्ञता पुरवतात. मात्र, या वाढीची ही वाटचाल टिकवून ठेवण्यासाठी समज, प्रतिभेची कमतरता आणि कौशल्यातील तफावत, या आव्हानांवर उपाय शोधणे आवश्यक आहे. काळाच्या पुढे विचार करण्याला आणि सर्वसमावेशक कामाच्या वातावरणाला चालना देऊन हे क्षेत्र अव्वल प्रतिभा आकर्षित करू शकते आणि भारताच्या आर्थिक परिप्रेक्ष्यात वाढीचा एक प्रकाशस्तंभ म्हणून त्यांच्या भूमिकेला नव्याने ओळख देऊ शकते.
श्री. अनिल कुमार सत्यवर्पू, मुख्य मानव संसाधन अधिकारी,
मॅग्मा जनरल इन्शुरन्स लिमिटेड (पूर्वी मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लि.)