९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ या स्पर्धेला सुरवात होणार आहे. त्यापूर्वी सूर्यकुमार यादवने बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे त्याची फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे.
माजी भारतीय दिग्गज फिरकी गोलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचा खेळाडू रविचंद्रन अश्विनने देवाल्ड ब्रेविसच्या कराराबाबत विधान केले होते. या विधानावर गोंधळ उडाला होता. त्यावर आता सीएसकेकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
आशिया कपच्या टी २० स्वरूपामध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूमध्ये बांगलादेशचा मशरफे मोर्तझाचे नाव आघाडीवर आहे. या लाजिरवाण्या विक्रमाच्या यादीत अनके खेळाडूंची नावे आहेत.
इंग्लंड आणि भारत यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिकेत ऋषभ पंत ला दुखापत झाली होती. संघ अडचणीत आला होता. हे उदाहरण डोळ्यामोर ठेवून बीसीसीआयने आगामी देशांतर्गत स्पर्धांसाठी एक नवा नियम तयार केला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी २० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेव्हिसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या २२ अर्धशतक झळकवून इतिहास रचला आहे.
नीरज चोप्राची पत्नी हिमानीने टेनिस कारकिर्दीचा निरोप घेतला आहे. आता हिमानी ही एखाद्या बिझनेस करण्याच्या तयारीता आहे. यासाठी तिने १.५ कोटी रुपयांची नोकरी देखील नकारली आहे.
आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त क्रीडा विश्वातून देखील मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा दिल्या जात आहे. जय शहापासून ते अनिल कुंबळे यांनी शुभेच्छा दिल्या आहे.
कॅरिबियन प्रीमियर लीग २०२५ मधील दुसरा सामना गयाना अमेझॉन वॉरियर्स आणि सेंट किट्स यांच्यात पार पडला. यामध्ये गयानाने बेन मॅकडर्मॉटने ७५ धावांची वादळी खेळी करून सर्वांचे लक्ष्य वेधले.
आशिया कप २०२५ ही स्पर्धा ९ सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे, यावेळी आशिया कप टी २० स्वरूपात खेळवला जाणार आहे. अशातच आता शुभमन गिल आणि संजू सॅमसन यांच्यात चांगलीच स्पर्धा रंगली आहे.
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण त्याच्या एका मुलखातीमुळे चर्चेत आला आहे. इरफानने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीबाबत एक खळबळजनक खुलासा केला आहे.
२०३० मध्ये होणारी राष्ट्रकुल स्पर्धा भारतात आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठीचा ठराव भारतीय ऑलिंपिक असोसिएशनने विशेष सर्वसाधारण सभेत पारित करण्यात आला आहे.
द हंड्रेड २०२५ च्या १३ व्या सामन्यात एक धक्कादायक घटना घडली. ट्रेंट रॉकेट्सचा यष्टिरक्षक फलंदाज टॉम अल्सोपला गंभीर दुखापत झाली. यामुळे त्याला अखेर मैदान सोडून जावे लागले.
भारताच्या महान फलंदाज असणाऱ्या विराट कोहलीने अनेक विक्रम रचले आहेत. त्याने एक आगळा-वेगळा विक्रम नोंदवला आहे. विराट कोहली हा भारताच्या स्वातंत्रदिनी शतक झळकवणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे.