फोटो सौजन्य - Social Media
इलेक्ट्रॉनिक्स आणि यांत्रिक अभियंते महासंचालनालय ( Directorate General of Electronics and Mechanical Engineers ) (DG EME) ने इलेक्ट्रॉनिक्स आणि यांत्रिक अभियंते विभागात विविध गट C पदांसाठी 625 जागांची भरती जाहीर केली आहे. सर्वत्र भारतातून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. या भरतीसाठी तपशीलवार माहिती खालीलप्रमाणे आहे:
आर्मी DG EME गट C अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीची सुरुवात २८ डिसेंबर २०२४ पासून होणार आहे. तर उमेदवारांना १७ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे. ही जाहिरात पेपरमध्ये देण्यात आली आहे. अर्ज शुल्क माफ आहे. या भरतीसाठी सर्व प्रवर्गातील उमेदवारांना निशुल्क अर्ज करता येणार आहे.
एका ठराविक वयोमर्यादेतील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अधिसूचनेनुसार, किमान वय १८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तर जास्तीत जास्त २५ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांसाठी अर्जाचे विंडो खुले आहेत. महत्वाची बाब म्हणजे नियमानुसार आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्कामध्ये काही प्रमाणात सूट देण्यात येणार आहे.
अधिसूचनेमध्ये काही शैक्षणिक पात्रता निकष नमूद आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना या निकषांना पात्र करणे अनिवार्य आहे. शैक्षणिक अट पदांवर निर्भर आहे. या भरतीसाठी फार्मासिस्ट, इलक्ट्रिशियन, वाहन मॅकेनिक आणि इतर पदांसाठी ITI, डिप्लोमा किंवा 10+2 शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांची आवश्यक आहे. LDC पदांसाठी 12वी पास असणे आवश्यक असून इंग्रजीत 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीत 30 शब्द प्रति मिनिट टायपिंग गती असावी. सर्व पदांसाठी तपशीलवार शैक्षणिक पात्रता जाहिरातीत नमूद आहे.
आर्मी DG EME गट C भरती 2024 साठी अर्ज कसा करावा हे खालीलप्रमाणे:
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरातीतील सर्व सूचना आणि अटी तपासून घेतल्याची खात्री करा. सर्व मुद्दे लक्षपूर्वक वाचून भरतीच्या तयारीला सुरुवात करा.