फोटो सौजन्य - Social Media
मारुत ड्रोन्स ही भारतातील आघाडीची ड्रोन तंत्रज्ञान कंपनी असून, त्यांनी प्रथमच ड्रोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी विनामूल्य डी.जी.सी.ए. (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) प्रमाणित पायलट प्रशिक्षण देण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमाद्वारे कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढावा आणि शेतकऱ्यांना अधिक सक्षम केले जावे, हा उद्देश आहे.
हे देखील वाचा : धक्कादायक! कॅनडामध्ये रेस्टॉरंटमध्ये वेटर, सेवा कर्मचारीच्या नोकरीसाठी हजारो भारतीय रांगेत
सर्वप्रथम ड्रोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत नोंदणी करून या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. हा ५-दिवसीय अभ्यासक्रम आहे, ज्यामध्ये ड्रोन संचालन, डेटा विश्लेषण, पे-लोड वापर यांसारख्या विषयांवर सखोल प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण घेतल्यानंतर, ग्राहकांना १० वर्षांसाठी वैध डी.जी.सी.ए. प्रमाणित रिमोट पायलट प्रमाणपत्र (RPC) मिळू शकते, जे कृषी ड्रोन वापरण्यासाठी आवश्यक असते.
“बाजारातील बहुतांश ड्रोन हे कीटकनाशक फवारणीसारख्या एकाच उद्देशासाठी डिझाइन केलेले आहेत. शेतकऱ्यांना सामोरे जावी लागणारी आव्हाने ओळखून आम्ही पहिले बहुउपयोगी ड्रोन एजी ३६५ हे विकसित केले आहे. बऱ्यापैकी ट्रॅक्टरप्रमाणेच, या ड्रोनला फक्त त्याच्या संलग्नकांमध्ये बदल करून विविध कामांसाठी अनुकूल बनवता येते, ज्यामुळे त्यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो. आपण वर्षानुवर्षे विविध कृषी अनुप्रयोगांसाठी ड्रोनचा वापर करू शकतो. शेतीमध्ये ड्रोनचा अवलंब करण्यासाठी एक मजबूत पर्यावरण प्रणाली (इकोसिस्टम) तयार करण्याच्या मारुतच्या संकल्पनेनुसार, आम्ही ऑक्टोबर महिन्यासाठी कोणत्याही खर्चाशिवाय सर्वसमावेशक कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रस्तुत करत आहोत. ड्रोन तंत्रज्ञान स्वीकारू पाहणाऱ्या आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवू पाहणाऱ्या व्यक्तींना “प्रवेश स्तरावरील समर्थन” प्रदान करणे हे मारुत यांचे उद्दिष्ट आहे. मारुत ड्रोन्स चे मुख्य कार्यकारी अधिकारी – सीईओ आणि सह-संस्थापक प्रेम कुमार विश्वनाथ म्हणाले की, “मारुत ड्रोन्स चा उपयोग करणारा एक ड्रोन उद्योजक ४०००० ते ९०००० रुपये प्रति माह पर्यंत कमवू शकतो, ज्या अन्वये तो आपल्या घरात आरामात काम करू शकतो आणि शेतकऱ्यांवर सकारात्मक प्रभाव टाकू शकतो.”
हे देखील वाचा : ब्लूमिंडेल्स आणि जसूबेन एमएल शाळांच्या वर्धापनदिनानिमित्त टपाल खात्यांकडून स्पेशल कव्हर !
एजी ३६५ नावाचे मारुतचे कृषी ड्रोन भारतीय परिस्थितीसाठी डिझाइन केलेले असून, कीटकनाशके फवारणीपासून ते ग्रॅन्यूल प्रसारित करण्यापर्यंत अनेक उद्देशांसाठी वापरले जाऊ शकते. ड्रोनमुळे पिकांचे नुकसान कमी होऊन उत्पादन वाढवता येते, आणि शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो.