फोटो सौजन्य - Social Media
जर तुम्ही राज्यात नोकरी शोधण्याचे प्रयत्न करत आहात. तर आता टेन्शन नॉट! स्वतः एसटी महामंडळाने सुवर्ण भरती आयोजित केली आहे. या भरतीच्या माध्यमारून कोकणकरांना फायदा होणार आहे. कारण रत्नागिरी विभागाच्या अंतर्गत ही भरती आयोजित करण्यात आली आहे. कोकणातील बेरोजगार पण स्किल उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. मुळात, ही प्रशिक्षणार्थी पदासाठी घेण्यात आलेली भरती आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे.
एकूण ४३४ पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. जर अर्ज ऑफलाईन स्वरूपात करायचे असेल तर ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत रत्नागिरीच्या एस टी विभाग कार्यालयात जाऊन अर्जाची नोंद करू शकतात. ऑनलाईन अर्ज www.apprenticeshipindia.org येथे करता येईल.
पण मुळात या भरतीसाठी दोन्ही पद्धतीने अर्ज करणे बंधनकारक आहे. तुम्हाला ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज नोंदवावे लागणार आहे. फक्त एक वर्षांच्या कालावधीसाठी तुम्हाला प्रशिक्षण देण्यात येईल. यांत्रिक डिझेल, यांत्रिक मोटारगाडी, बीजतंत्री, पत्राकारागीर, सांधाता, कातारी, यंत्र कारागीर, रेफिजरेशन अँड एयर कडीशनिंग, साठा जोडारी, सुतार, रंगारी तसेच शिवणकाम विभागात उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. दरम्यान, यांत्रिक डिझेल पदासाठी एकूण ११० जागा रिक्त आहेत, यांत्रिक मोटारगाडी पदासाठी एकूण ११० जागा रिक्त आहेत, बीजतंत्री पदासाठी ६० तर पत्राकारागीर पदासाठी एकूण ४४ पदे रिक्त आहेत. सांधाता पदासाठी २५ तर कातारी पदासाठी एकूण १० पदे रिक्त आहेत.
यंत्र कारागीर पदासाठी १०, रेफीजरेशन पदासाठी ५ तर साठा जोडारी पदासाठी एकूण ४४ पदे रिक्त आहेत. रंगारी १० तर शिवणकाम पदासाठी २ पदे रिक्त आहेत. जाहिरातीमध्ये वयोमर्यादा संबंधित कोणतीही नोंद नमूद नाही. ३० सप्टेंबर अगोदर उमेदवारांनी अर्जाची नोंद पूर्ण करा.