सरकारी नोकरी संधी! इंजीनियर्स इंडिया लिमिटेडमध्ये मोठी भरती; 'ही' आहे अर्ज करण्याची शेवटची मुदत
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी इंजीनियर्स इंडिया लिमिटेडमध्ये मोठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 77 पदे भरली जाणार आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. या भरतीबाबतच्या जाहिरीतीची पीडीएफ खाली दिलेली आहे. उमेदवारांनी ही पीडीएफ काळजीपुर्वक वाचावी.
77 रिक्त जागा भरल्या जाणार
इंजीनियर्स इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अभियंता/अधिकारी/वैज्ञानिक अधिकारी/वास्तुविशारद, उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक पदांच्या एकूण 77 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2024 असणार आहे.
(फोटो सौजन्य – ईआयएल अधिकृत संकेतस्थळ)
संस्थेचे नाव – इंजीनियर्स इंडिया लिमिटेड
भरली जाणारी पदे – अभियंता/अधिकारी/वैज्ञानिक अधिकारी/वास्तुविशारद, उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक
एकुण रिक्त पद संख्या – 77 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 सप्टेंबर 2024
भरतीचा तपशील
– वैज्ञानिक अधिकारी / आर्किटेक्ट / व्यवस्थापक / वरिष्ठ व्यवस्थापक – 10 जागा रिक्त
– अभियंता/उपव्यवस्थापक – 05 जागा रिक्त
– उपव्यवस्थापक/व्यवस्थापक – 50 जागा रिक्त
– वरिष्ठ व्यवस्थापक – 08 जागा रिक्त
– अधिकारी – 01 जागा रिक्त
– डेप्युटी महाव्यवस्थापक – 02 जागा रिक्त
– व्यवस्थापक – 01 जागा रिक्त
हेही वाचा – पुण्यात नोकरीची मोठी संधी, अडीच लाखापर्यंत मिळेल पगार; वाचा… सविस्तर जाहिरात!
कसा कराल अर्ज
इंजीनियर्स इंडिया लिमिटेड अंतर्गत अभियंता/अधिकारी/वैज्ञानिक अधिकारी/वास्तुविशारद, उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2024 असणार आहे. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. असे इंजीनियर्स इंडिया लिमिटेडने आपल्या जाहिरातीत म्हटले आहे.
काय करते ही कंपनी
इंजीनियर्स इंडिया लिमिटेड ही भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील औद्योगिक तंत्रज्ञान, अभियांत्रिकी सल्लागार आणि तंत्रज्ञान परवाना देणारी कंपनी आहे. 1965 मध्ये हायड्रोकार्बन प्रकल्पांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञान उपाय प्रदान करण्याच्या या कंपनीची स्थापना करण्यात आली. गेल्या काही वर्षांत, नॉन-फेरस मेटलर्जी, पायाभूत सुविधा, पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन आणि खत यांसारख्या सिनेर्जिस्टिक क्षेत्रांमध्येही या कंपनीने विविधता आली आहे.
अधिक माहितीसाठी वाचा जाहिरात पहा – https://recruitment.eil.co.in/hrdnew/others/FINAL%20ONLINE%20detailed%20advertisement%202024-25-01.pdf
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – https://www.engineersindia.com/Applying-to-EIL
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://engineersindia.com/ ला भेट द्या.